एक्स्प्लोर

वाघिणीसारख्या लढणाऱ्या सेरेनाचं एक पाऊल मागे

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत सेरेनाचा सामना रशियाच्या मारिया शारापोव्हाशी होणार होता. पण या सामन्याआधीच सेरेनाला फ्रेन्च ओपनमधून माघार घेण्याची वेळ आली.

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं हाताच्या दुखापतीमुळं फ्रेन्च ओपनमधून माघार घेतली आहे. महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत सेरेनाचा सामना रशियाच्या मारिया शारापोव्हाशी होणार होता. या सामन्याविषयी टेनिसरसिकांमध्येही कमालीची उत्सुकता होती. पण या सामन्याआधीच सेरेनाला फ्रेन्च ओपनमधून माघार घेण्याची वेळ आली. ती आली... ती नेटानं खेळली... पण उजव्या दंडाच्या दुखापतीसमोर तिचा नाईलाज झाला. सेरेना विल्यम्सला आपली मोहीम अर्ध्यावरच सोडून फ्रेन्च ओपनमधून माघार घ्यावी लागली. पण सेरेना विल्यम्सनं एक स्त्री म्हणून आपल्या समोरच्या आव्हानांना सामोरं जाण्याची दाखवलेली जिद्द लक्षात घेतली, तर फ्रेन्च ओपनमधून माघार घेऊनही तिला चॅम्पियनच म्हणावं लागेल. ग्रँड स्लॅमच्या टेनिसच्या दुनियेत आजवर तब्बल 23 विजेतीपदांची कमाई करणारी सेरेना विल्यम्स ही आजच्या जमान्याची चॅम्पियन आहेच, पण फ्रेन्च ओपनमधल्या निव्वळ सहभागानंही तिला वन ऑफ द ग्रेटेस्ट चॅम्पियन ठरवलं आहे. सेरेना विल्यम्सनं २८ जानेवारी २०१७ रोजी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, त्या वेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. दस्तुरखुद्द सेरेनानं एप्रिल महिन्यात हा गौप्यस्फोट केला त्या वेळी तुम्ही आम्ही अक्षरश: तोंडात बोटं घातली होती. त्यानंतर सेरेनानं एक सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या लेकीला म्हणजे अॅलेक्सिस ऑलिम्पियाला जन्म दिला. त्या वेळी कुणी स्वप्नातही विचार केला नसावा की, ही वीरांगना अवघ्या साडेआठ महिन्यांमध्ये पुन्हा ग्रँड स्लॅमच्या कोर्टवर सर्वोच्च दर्जाचं टेनिस खेळताना दिसेल. सेरेनानं रोलँड गॅरोसवरच्या फ्रेन्च ओपनमध्ये तो चमत्कार घडवला. सेरेनानं हा चमत्कार घडवला त्यावेळी वय तिच्या बाजूनं नव्हतं. येत्या चार महिन्यांमध्ये ती ३७ वर्षांची होणार आहे. एक ३६ वर्षांची स्त्री पहिल्या बाळंतपणानंतर केवळ साडेआठ महिन्यांमध्येच सर्वोच्च दर्जाचं टेनिस खेळू शकते, हा तिच्या सुपर फिटनेसचा अविष्कार होता. त्या सुपरफिट सेरेनानं मग सव्वीस वर्षांची क्रिस्टिना प्लिस्कोवा, बावीस वर्षांची अॅशली बार्टी आणि एकोणतीस वर्षांची ज्युलिया जॉर्जेस यांना एकापाठोपाठ एक गारद केलं. सेरेनाच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे, हे कितीही खरं असलं तरी वय आणि फिटनेस कुणालाही दडवता येत नसतो. सेरेनानं पहिल्या तीन राऊंड्समध्ये आपल्यापेक्षा तरुण आणि सध्या आपल्यापेक्षा वरचं मानांकन असलेल्या तिघींना हरवण्याची हिंमत दाखवली. तेही बाळंतपणानंतर अवघ्या साडेआठ महिन्यांत. याच कारणामुळं सेरेना विल्यम्स ही सुपर चॅम्पियन आहे. अखेर उजव्या दंडाच्या दुखापतीनं सेरेना विल्यम्सला फ्रेन्च ओपनची मोहीम अर्ध्यावरच सोडायला लावली. पण या दुखापतीतून लवकरात लवकर सावरून, पुन्हा ग्रँड स्लॅममध्ये खेळण्यासाठी ती अजूनही उत्सुक असावी. कारण मार्गारेट कोर्टचा सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा विक्रम तिला खुणावत आहे. ग्रँड स्लॅमच्या इतिहासात सेरेना विल्यम्सच्या खजिन्यात आता २३ ग्रँड स्लॅम विजेतीपदं जमा आहेत. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या विक्रमापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. ऑल द बेस्ट, सेरेना विल्यम्स.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Embed widget