एक्स्प्लोर
तब्बल 186 आठवड्यानंतर सेरेनाने अव्वल स्थान गमावलं

अमेरिकेच्या अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचं अमेरिकन ओपनमधलं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं आहे. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हानं सेरेना विल्यम्सचं आव्हान 6-2, 7-6 असं धुळीला मिळवलं. अमेरिकन ओपन जिंकून कारकीर्दीतीलं तेविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याची सेरेनाची संधी उपांत्य फेरीत झालेल्या या पराभवामुळं हुकली. तसंच जागतिक क्रमवारीत सलग 187 व्या आठवड्यात नंबर वनवर कायम राहण्याचा मानही सेरेनाला गमवावा लागला आहे. येत्या सोमवारी सुधारित जागतिक क्रमवारी जाहीर होणार असून, त्यात जर्मनीची अँजेलिक कर्बर महिला एकेरीच्या अव्वल स्थानावर विराजमान होईल.
आणखी वाचा























