(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asian Games 2023: नेमबाजीत आणखी एक गोल्ड; सरबजोत, अर्जुन आणि शिवा या त्रिकुटानं साधला सुवर्णवेध
Sarabjot Singh: भारतीय नेमबाज सरबज्योत सिंह, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंह चीमा यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यानं पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
Asian Games Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार सुरुवात केली आहे. भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवी हिने रौप्यपदक जिंकलं. त्याचबरोबर यानंतर नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळालं आहे. भारतीय नेमबाज सरबज्योत सिंह, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंह चीमा यांनी पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताचं हे आजच्या दिवसातलं दुसरं पदक आहे.
भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीचं गोल्ड हुकलं
भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलंय. रोशिबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, परंतु अंतिम सामन्यात ती हरली. चीनच्या खेळाडूनं महिलांच्या 60 किलो गटात रोशिबिना देवीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं. रोशीबिना देवी आज फायनल जिंकण्यात यशस्वी ठरली असती तर तिनंही इतिहास रचला असता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला वुशूमध्ये कधीही सुवर्णपदक जिंकता आलेलं नाही. रोशिबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण ती थोडक्यात हुकली.
Great news from #AsianGames !!!
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 28, 2023
Our Men's 10m Air Pistol Team - Sarabjot Singh, Shiva Narwal, and Arjun Singh Cheema won GOLD!
Congratulations to our Champions!#AsianGames2022 #Hangzhou2023 pic.twitter.com/fNidbEXGBX
----