एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाडेकरु न मिळाल्याने सचिन तेंडुलकरला करात सूट

45 वर्षीय सचिन तेंडुलकरचे पुण्यात दोन फ्लॅट असून एक सॅफायर पार्क (60.6 लाख रुपये) आणि ट्रेजर पार्क (82.8 लाख रुपये) इथे आहे.

मुंबई : आयकर अपीलेट लवादच्या (आयटीएटी) मुंबई खंडपीठाने कर वादातील एका प्रकरणात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या बाजूने निकाल दिला आहे. आयटीएटीने 2012-13 च्या आर्थिक वर्षादरम्यान, सचिन तेंडुलकरच्या पुण्यातील फ्लॅटवरील उत्पन्न शून्य असल्याचं नमूद केलं, यामुळे त्याला आता कोणताही कर भरावा लागणार नाही. आयटीएटीने सचिनच्या पुण्यातील एका फ्लॅटमधून अंदाजे 1.3 लाखांचा कर न घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निर्णयामुळे सचिनचे 1.3 लाख रुपये वाचले आहेत. 2012-13 या आर्थिक वर्षांत पुण्यातील फ्लॅटसाठी भाडेकरु मिळाला नव्हता, त्यामुळे भाड्यातून येणाऱ्या मिळकतीवर कर देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरकडून करण्यात आला होता. सचिनने म्हटलं होतं की, "एका फ्लॅटमधून मला दर महिन्याला 15 हजार रुपयांचं भाडं मिळतं. तर दुसऱ्या फ्लॅटसाठी भाडेकरु मिळाला नाही. त्यामुळे आयटी अॅक्ट 1961च्या कलम 23 (1) (सी) नुसार मला व्हेकन्सी अलाऊन्स मिळावा. " जर संपूर्ण आर्थिक वर्षात एखादी संपत्ती रिकामी राहिली तर करदात्यांना व्हेकन्स अलाऊन्स नियमानुसार सूट दिली जाते. आयटी अॅक्ट अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घरं असतील, तर तो दोन्हीपैकी एक फ्लॅट स्वत:ला राहण्यासाठी वापरुन कर वाचवू शकतो. 45 वर्षीय सचिन तेंडुलकरचे पुण्यात दोन फ्लॅट असून एक सॅफायर पार्क (60.6 लाख रुपये) आणि ट्रेजर पार्क (82.8 लाख रुपये) इथे आहे. आयटीएटीने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं होतं की, तेंडुलकरने 2012-13 या आर्थिक वर्षात 61.23 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Embed widget