एक्स्प्लोर
देशवासियांनो मला माफ करा, रुबेल हुसेनची भावूक पोस्ट
या निर्णायक षटकामध्येच भारताच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. त्यामुळे या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या रुबेल हुसेनने फेसबुक पोस्ट लिहून देशवासियांची माफी मागितली आहे.

कोलंबो : ''सामना संपल्यापासून अत्यंत वाईट वाटतंय. माझ्यामुळे बांगलादेशच्या एवढा जवळ आलेला विजय हातातून जाईल, असं कधीही वाटलं नव्हतं. यासाठी मी दिलगीर आहे. मला माफ करा,'' अशी फेसबुक पोस्ट बांगलादेशचा गोलंदाज रुबेल हुसेनने लिहिली आहे.
दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
दिनेश कार्तिक मैदानात उतरला त्या वेळी टीम इंडियाला विजयासाठी बारा चेंडूंत तब्बल 34 धावांची आवश्यकता होती. समोर नवखा विजय शंकर चाचपडत उभा होता. पण टीम इंडियाच्या सुदैवाने दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळाला आणि त्याने रुबेल हुसेनवर हल्ला चढवला. दिनेश कार्तिकने एकोणिसाव्या षटकात 22 धावांची लूट केली. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या षटकांत सहा चेंडूंवर बारा धावांची गरज होती.
या निर्णायक षटकामध्येच भारताच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. त्यामुळे या पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या रुबेल हुसेनने फेसबुक पोस्ट लिहून देशवासियांची माफी मागितली आहे.
संबंधित बातम्या :
विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू
दिनेश कार्तिकचा विजयी षटकार, तिरंगी मालिका भारताच्या खिशात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
