RR vs DC, 1st Innings Score: ऋषभ पंतचं अर्धशतक, दिल्लीचं राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान
RR vs DC , IPL 2021 1st Innings Highlights:दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या.
RR vs DC , IPL 2021 1st Innings Highlights: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना सुरु आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमधील या लढतील दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या.
दुसऱ्याच ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटनं पृथ्वी शॉला 2 धावांवर पृथ्वी शॉला बाद केलं. त्यानंतर पुढच्या चौथ्या षटकात जयदेव उनाडकटनं शिखर धवनला 9 धावांवर बाद करत दिल्लीची सलामीची जोडी तंबूत पाठवली. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. त्यालाही जयदेवनं 8 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसला मुस्तफिजुरनं शून्यावर तंबूत पाठवलं.
यानंतर आलेल्या ललित यादवला सोबत घेऊन दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं डावाला आकार दिला. ऋषभनं 31 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 51 धावा केल्या. त्यानंतर तो धावबाद झाला. ललित यादवनं 20 धावांची खेळी केली तर टॉम करननं 21 धावा केल्या. तर ख्रिस वोक्सनं 15 धावा करत संघाला 147 धावसंध्येवर नेऊन ठेवले.