एक्स्प्लोर

सतत अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा

टीम इंडिया सध्या एका पोठापाठ एक विजय मिळवत असली तरीही धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला वेळीच आपला फॉर्म सुधारावा लागेल.

मुंबई : टीम इंडिया सध्या एका पोठापाठ एक विजय मिळवत असली तरीही धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला वेळीच आपला फॉर्म सुधारावा लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर टी-20 तिरंगी मालिकेतही रोहितचा खराब फॉर्म कायम आहे. टी-20 तिरंगी मालिकेच्या तीनही सामन्यात रोहित शर्मा एकही मोठी खेळी करु शकला नाही. कालच्या (सोमवार) सामन्यातही रोहित शर्मा अवघ्या 11 धावा करुन माघारी परतला. सुदैवाने मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने लंकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. पण या महत्त्वाच्या सामन्यातही रोहित अपयशी ठरल्याने क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत 'बॅड पॅच' येतो. पण रोहितच्या बाबतीत असा 'बॅड पॅच' अनेकदा आला आहे. त्यामुळे आता रोहितच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, पुढच्या वर्षी विश्वचषक होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ हे विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. सध्या प्रत्येक सामन्यातील कामगिरीवर निवडी समितीचं लक्ष आहे.अशावेळी ज्या खेळाडूंचा फॉर्म खराब आहे त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. टी-20 पेक्षा वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे तसा जास्त वेळ असतो. पण मागील मालिकेतही रोहित शर्मा अपयशी ठरला होता. त्यामुळे रोहितने वेळीच आपला फॉर्म सुधारला नाही तर त्यालाही संघातून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत रोहितचा खेळ पाहाता सर्वांनीच त्याची पाठराखण केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. नुकतंच बीसीसीआयने केलेल्या करारात रोहितला ए प्लस यादीतही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन रोहितला आपल्या खेळात आता तात्काळ बदल करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
FIFA World Cup : फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
Vaibhav Sooryavanshi : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z
कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget