Rohit Sharma VIDEO: श्रेयस अय्यरने स्टेजवर ट्रॉफी स्वीकारुन खाली येताच एक चूक केली, पण हिटमॅन रोहितने क्षणात पाहिलं अन्..! हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
Rohit Sharma VIDEO: हिटमॅनचा ट्रॉफीबद्दल आदर दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रेयस अय्यरला उत्कृष्ट फलंदाजीसाठी सन्मानित करण्यात आले.

Rohit Sharma viral video: टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma trophy respect) आजवर नेहमीच पुरस्कार आणि ट्रॉफी मोठ्या आदराने (Rohit Sharma leadership) स्वीकारताना दिसून आला आहे. त्यामुळे पुरस्कार आणि ट्रॉफीबद्दल त्याचा आदर, सन्मान नेहमीच दिसून आला आहे. हिटमॅन रोहितचा पुरस्कार आणि ट्रॉफीबद्दल सन्मान फक्त वैयक्तिक नसून तो सहकाऱ्यांप्रती सुद्धा तितकाच असल्याचे दाखवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होता आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आदराने श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer award video) पुरस्कारात जिंकलेली ट्रॉफी जमिनीवरून टेबलवर ठेवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ कॅट क्रिकेट अवॉर्ड्स 2025 चा आहे, जिथे श्रेयस अय्यरला पुरस्कार मिळाला. रोहित शर्मालाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात इतर अनेक क्रिकेटपटूंनाही सन्मानित करण्यात आले.
श्रेयस अय्यरची चूक अन् रोहितची क्षणात नजर (Rohit Sharma Shreyas Iyer)
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीबद्दल केलेला आदर चर्चेचा विषय झाला आहे. कॅट क्रिकेट अवॉर्ड्स 2025 दरम्यान, एका व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरने चुकून क्षणभरासाठी त्याची पुरस्कारात मिळालेली ट्रॉफी जमिनीवर ठेवली. हे पाहून रोहित शर्माने लगेच उचलली आणि टेबलावर परत ठेवली. श्रेयस अय्यरला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला. तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला होता.
View this post on Instagram
श्रेयस अय्यरची कामगिरी (Shreyas Iyer Champions Trophy 2025)
श्रेयस अय्यर हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने पाच डावात 243 धावा केल्या आणि दोन महत्त्वाची अर्धशतके ठोकली. त्याचा संयमी, आक्रमक खेळ आणि सामन्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता भारताच्या सलग दुसऱ्या आयसीसी ट्रॉफी विजयात महत्त्वाची होती. यापूर्वी, टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषक देखील जिंकला होता.
श्रेयस अय्यर स्वतः म्हणाला की, "या सर्व स्पर्धांमधील माझ्या चांगल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास आणि गती वाढली. त्यानंतर मला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली, जिथे मी माझी छाप पाडली." दुसरीकडे, 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयस अय्यर आता भारताचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल. या वर्षी आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये, श्रेयस अय्यरने 53 च्या सरासरीने आणि 93.59 च्या स्ट्राईक रेटने 424 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. हे आकडे कठीण परिस्थितीतही त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि संघात महत्त्वाची भूमिका बजावण्याची त्याची क्षमता दर्शवतात.
इतर महत्वाच्या बातम्या


















