Rohit Sharma on Virat Kohli : हिटमॅनचे बोल अन् टीकाकारांची बत्ती गुल! विराट कोहलीच्या शतकावर 'गंभीर' होणाऱ्यांना कॅप्टन रोहितची दोनच वाक्यात सणसणीत चपराक
विराट कोहलीने केलेल्या शतकी धावाही आफ्रिकेच्या संघाला मिळून करता आल्या नाहीत. ज्या खेळपट्टीवर धावा निघणं कठिण होत असताना कोहली लढला, त्याठिकाणी आफ्रिकन फलंदाजी कोलमडली.
Rohit Sharma on Virat Kohli : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 327 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 27.1 षटकात केवळ 83 धावांवरच आटोपला. विराट कोहलीने केलेल्या शतकी धावाही आफ्रिकेच्या संघाला मिळून करता आल्या नाहीत, इतका भेदक मारा टीम इंडियाच्या गोलदाजांनी केला. ज्या खेळपट्टीवर धावा निघणं कठिण होत असताना कोहली लढला, त्याठिकाणी आफ्रिकन फलंदाजी कोलमडली.
हिटमॅनचे बोल अन् टीकाकारांची बत्ती गुल!
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विक्रमी खेळी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी केली. मात्र, त्याच्या संघाच्या गरजेनुसार केलेल्या संयमी शतकी खेळीवरून टीका होत आहे. यावरून विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, इडन गार्डनची खेळपट्टी सोपी नव्हती, तुम्हाला या खेळपट्टीवर विराट कोहलीसारख्या व्यक्तीची गरज होती. दोनच वाक्यात रोहितने प्रतिक्रिया देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, जर तुम्ही आमचे शेवटचे तीन सामने पाहिले तर तुम्ही म्हणाल की आमच्या संघाने परिस्थितीनुसार स्वत:ला चांगले जुळवून घेतले. इंग्लंडविरुद्ध आम्ही दडपणाखाली होतो, पण चांगली धावसंख्या उभारल्यानंतर उर्वरित काम वेगवान गोलंदाजांनी पूर्ण केले.
Rohit Sharma said, "the pitch wasn't easy, you needed someone like Virat Kohli on this pitch". pic.twitter.com/cE35ymH8ep
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला की विराट कोहली परिस्थितीनुसार खेळतो. आमचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात, त्यानंतर खेळपट्टी काम करते. याशिवाय रोहित शर्माने श्रेयस अय्यरबद्दल मत व्यक्त केले. श्रेयस अय्यर अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नसला तरी मला त्याला खेळताना पाहायला आवडेल. आम्हाला या खेळाडूवर विश्वास ठेवायला हवा. कोणताही खेळाडू दररोज चांगला खेळ करू शकत नाही.
Rohit Sharma and Virat Kohli clarify the condition at Eden Gardens and the message to keep batting around Virat Kohli. pic.twitter.com/D7XcFkR6lW
— CricTracker (@Cricketracker) November 5, 2023
रोहित शर्मा शमी-गिल आणि जडेजाबद्दल काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला की, मोहम्मद शमी पुनरागमनानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी करत आहे त्यावरून त्याची मानसिकता दिसून येते. त्याचवेळी मी शुभमन गिलसोबत बराच काळ फलंदाजी करत आहे. आमच्याकडे कोणतीही रणनीती नाही, आम्ही फक्त ओव्हर टू ओव्हर खेळण्याचा प्रयत्न करतो आणि परिस्थितीनुसार. रवींद्र जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत खेळत आहे, या खेळाडूने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. जडेजा आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आज आम्ही पाहिले. त्याने शेवटच्या षटकांमध्ये धावा केल्या, त्यानंतर गोलंदाजीत 5 खेळाडू बाद केले. त्याची भूमिका काय आहे, हे जडेजाला चांगलेच ठाऊक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या