Virat Kohli : देवाची बरोबरी, पण मैदानात देवासारखा शांत अन् नेहमीचं सेलिब्रेशन सुद्धा नाही! शतकी खेळीवर विराट म्हणाला तरी काय?
Virat Kohli : टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 121 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावांची नाबाद खेळी खेळली.हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते.
कोलकाता : टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 121 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावांची नाबाद खेळी खेळली.हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. यासह त्याने त्याचाच हिरो सचिन तेंडुलकरच्या 49व्या वनडेतील विक्रमाची बरोबरी केली. विराटने आपल्या 35व्या वाढदिवसाला हे शतक केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुद्धा जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेला 83 धावात गुंडाळत 243 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे विराटच्या शतकाचे ट्रिपल सेलिब्रेशन झालं आहे. सामन्याचा मानकरी किंग कोहली ठरला. जडेजाने पाच विकेट घेत आफ्रिकेला भगदाड पाडले.
People were complaining Virat Kohli played slow and India are below par.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
- South Africa struggling to put the bat on the ball currently! pic.twitter.com/NM1fBXNeb1
विराट कोहलीची खेळी का संथ होती?
डाव संपल्यानंतर विराट कोहली संथ खेळीबद्दल म्हणाला की, ही अशी विकेट होती ज्यावर फलंदाजी करणे कठीण होते. रोहित आणि शुभमनकडून आम्हाला चांगली सुरुवात झाली, ती पुढे चालू ठेवण्याचे माझे काम होते. 10व्या षटकानंतर चेंडू फिरू लागला. वेग कमी झाला आणि मग माझी भूमिका वाढत गेली. माझा प्रयत्न जास्त काळ फलंदाजी करण्याचा होता. संघ व्यवस्थापनाने मला हेच सांगितले.
King Kohli becomes the first Indian to score a World Cup century on birthday. pic.twitter.com/8PXzLQU6fi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
श्रेयस अय्यरची स्तुती करताना माझे मन मोकळे झाले
श्रेयस अय्यरच्या शानदार खेळीचे कौतुक करताना शतकवीर म्हणाला की, श्रेयस चांगला खेळला आणि शेवटी आम्ही आणखी काही धावा केल्या. आशिया चषकादरम्यान आमच्यात खूप चर्चा झाली. आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे खेळाला पुढे नेण्यासाठी ही भागीदारी आवश्यक होती. आमच्या संघात हार्दिक नाही, त्यामुळे आम्हाला माहित होते की एक किंवा दोन विकेट आम्हाला महागात पडू शकतात.
Most runs in the 2023 World Cup:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
Quinton De Kock - 545 (77.86 average).
Virat Kohli - 543 (108.60 average). pic.twitter.com/jKSZY0cKAK
देवाचे आभार मानले
कोहलीने देवाचे आभार मानले आणि म्हणाला की, मला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आणि संघाच्या यशात योगदान दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. तुमच्या वाढदिवशी या मोठ्या स्थळी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर शतक झळकावणं खूप छान आहे.
AB De Villiers was the first to congratulate Virat Kohli.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 5, 2023
- The bond between two greatest!pic.twitter.com/0D83VCcDIN
इतर महत्वाच्या बातम्या