Rohit Sharma : खेळपट्टीवरून 'रडीचा भोंगा' करणाऱ्यांना कॅप्टन रोहितचं त्यांच्याच भाषेत उत्तर! म्हणाला, जोपर्यंत मला...
Rohit Sharma : पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर भारताने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि दोन दिवसांतच सामना जिंकला. कसोटी इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला.
Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी दोन दिवसात संपली. भारताने हा सामना 7 विकेटने जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताला मालिका अनिर्णित ठेवण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बमुराहने 61 धावांत 6 बळी घेत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 176 धावांत रोखले. भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्याने 12 षटकात 3 गडी गमावून 80 धावा करून पूर्ण केले. पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर भारताने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि दोन दिवसांतच सामना जिंकला. कसोटी इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला.
रोहित शर्माने केपटाऊनच्या विजयाला ग्रेट म्हटले
या विजयासह एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. ऐतिहासिक केपटाऊन कसोटी जिंकल्यानंतर तो म्हणाला की, ही एक मोठी उपलब्धी आहे. सेंच्युरियनमध्ये आम्हाला चुकांमधून शिकावे लागले. आम्ही खूप चांगले पुनरागमन केले, विशेषतः आमचे गोलंदाज. काही योजना केल्या आणि संघाला बक्षीस मिळाले. आम्ही योजना व्यवस्थित राबवली. आम्ही चांगली फलंदाजी करत 100 धावांची आघाडी घेतली.
खेळपट्टीवरून कॅप्टन रोहितचं त्यांच्याच भाषेत उत्तर!
रोहित शर्मा म्हणाला की, जोपर्यंत प्रत्येकजण भारतात तोंड बंद ठेवतो आणि भारतीय खेळपट्ट्यांबद्दल तक्रार करत नाही तोपर्यंत अशा खेळपट्ट्यांवर खेळायला माझी हरकत नाही. तुम्ही इथे स्वतःला आव्हान देण्यासाठी आलात आणि लोक भारतात येतात तेव्हा ते सुद्धा आव्हानात्मक असते.
डावाच्या पराभवानंतर अशी योजना केली
सेंच्युरियन कसोटीत भारताचा एका डावाने पराभव झाला. यानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. आता टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ 55 धावांवर रोखून दमदार कामगिरी करत केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला. धावा न करता 6 विकेट गमावण्याबाबत तो म्हणाला की, शेवटच्या सहा विकेट्स बघून आनंद झाला नाही. आम्हाला माहित होते की हा एक छोटासा सामना असणार आहे. धावा महत्त्वाच्या आहेत हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे आघाडी मिळणे अत्यंत गरजेचे होते.
विजयाचा नायक कोण?
सिराज, बुमराह आणि मुकेश यांच्या गोलंदाजीचे कौतुक करताना कर्णधार म्हणाला की, हे खूप खास आहे. तो नेहमी असे काहीतरी करतो जे तुम्हाला अनेकदा पाहायला मिळत नाही. आम्ही गोष्टी साध्या ठेवण्याबद्दल बोललो आणि तेच घडले. खेळपट्टीने बाकीचे केले. याचे बरेच श्रेय सिराज, बुमराह, मुकेश आणि प्रसिद्ध यांना जाते.
डीन एल्गरचे कौतुक करताना म्हणाला
तो पुढे म्हणाला की, आम्हाला मालिका जिंकायला आवडले असते, पण दक्षिण आफ्रिका हा मोठा संघ आहे. ते नेहमीच आम्हाला आव्हान देतात, तो एक चांगला संघ आहे. या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटू शकतो. तो (एल्गर) दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो खूप धैर्यवान आहे. आम्ही त्याचे कौतुक करतो. मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. उत्तम कारकीर्द, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
इतर महत्वाच्या बातम्या