Rohit Sharma, Virat Kohli : इकडं सूर्यकुमार यादव-हार्दिक पांड्या जायबंदी अन् तिकडं रोहित अन् विराटनं एकाचवेळी होकार दिल्यानं बीसीसीआय टेन्शनमध्ये!
Rohit Sharma, Virat Kohli : टीम इंडियाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत वरिष्ठ खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma, Virat Kohli : अवघ्या सहा महिन्यांवर असलेल्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (BCCI) टेन्शन वाढू शकतं. जून महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे फक्त तीन T20 सामने आहेत आणि हे तीन सामने याच महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहेत. या दौऱ्यातून निवड समिती विश्वचषकासाठी भारतीय संघाचे योग्य संयोजन ठरवू शकणार नाहीत किंवा जूनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी संघात कोणाचा समावेश करायचा हे ते ठरवू शकणार नाही. सर्वात मोठी अडचण म्हणजे हिटमॅन रोहित आणि किंग विराट कोहलीने सुद्धा या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा स्थितीत संघ निवड बीसीसीआयसाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
Around 30 odd players could be monitored during IPL for the T20I World Cup 2024. [PTI] pic.twitter.com/EMxzrTAWar
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2024
निवड समिती चर्चा करणार
बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोहली आणि विराटने जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग व्हायचं असल्याचे स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतर दोन निवडकर्त्यांशीही चर्चा करतील, असेही म्हटले आहे.
Rohit Sharma & Virat Kohli are keen to play the T20 World Cup in June. [PTI] pic.twitter.com/nHgThnO9tT
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2024
दुसरीकडे, विराट आणि रोहित अफगाणिस्तान मालिकेत सहभागी होणार हे सुद्धा निश्चित नाही. टीम इंडियाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या कामगिरीवरच टीम इंडियाचा निर्णय
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अफगाणिस्तान मालिका टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक संघाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देणार नाही. अशा परिस्थितीत, आयपीएल दरम्यान 25-30 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल आणि त्यांच्यामधून टी-20 विश्वचषक संघाची निवड केली जाईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फिट नाहीत. अशा स्थितीत अफगाणिस्तान मालिकेतून फारसा निष्कर्ष काढता येणार नाही. आयपीएलच्या पहिल्या महिन्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या