एक्स्प्लोर
रोहित शर्मा बाबा झाला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला रोहित 'गूड न्यूज' ऐकल्यानंतर मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबई : भारताचा क्रिकेटर रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रविवारी 30 डिसेंबवर रोहितची पत्नी रितिकाने मुलीला जन्म दिला. रितिकाची चुलत बहीण आणि अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खानने सगळ्यात आधी इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला रोहित 'गूड न्यूज' ऐकल्यानंतर मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
'Hublot'च्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये रोहितने सर्वप्रथम रितिकाच्या प्रेगनन्सीच्या बातमीला दुजोरा दिला होता. रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत गप्पा मारताना म्हटलं होतं की, "मी लवकरच बाबा होणार आहे आणि मी जास्त वाट पाहू शकत नाही. माझं आयुष्य बदलणारा हा क्षण आहे. मी याची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो."
रोहित शर्माने मेलबर्नमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार 63 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 नेआघाडीवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज