एक्स्प्लोर
छोटा पॅक, बडा धमाका, रिषभ पंतची दिमाखात एण्ट्री
मुंबई: रणजी सामन्यात वादळी खेळी करुन, टीम इंडियाच्या दरवाजावर उभ्या असलेल्या दिल्लीच्या तरण्याबांड रिषभ पंतने अखेर दिमाखात एण्ट्री केली आहे. 19 वर्षीय विकेटकीपर फलंदजा रिषभ पंतने भारताच्या टी ट्वेण्टी संघात स्थान मिळवलं आहे.
गेल्यावर्षी दिल्लीकडून खेळणाऱ्या रिषभने रणजी चषकात 48 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकून, रणजी स्पर्धेतील सर्व रेकॉर्ड मोडले होते.
कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा
पंतचं यंदाच्या 2016/17 हंगामातील हे चौथं शतक होतं. यापूर्वी त्याने एक त्रिशतकही ठोकलं होतं. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या सहाव्या खेळीतील हे त्याचं चौथं शतक होतं. यापूर्वी त्याने 146, 308, 24, 60 आणि117 धावांच्या खेळी साकारल्या होत्या. तसंच रिषभने 19 वर्षांखालील विश्वचषकात 24 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह 78 धावांची खेळी साकारली होती. त्याची ही खेळी एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ठरली होती. दरम्यान, रिषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच पदार्पण करणार होता. दुखापतग्रस्त रिद्धीमान साहाच्याजागी त्याची निवड होता-होता राहिली होती. मात्र जबरदस्त खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या रिषभने अखेर टीम इंडियात प्रवेश मिळवला आहे. वन डे भारतीय संघ : विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), के एल राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव टी-ट्वेण्टी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंह, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा संबंधित बातम्यारणजी: रिषभ पंतने सर्व रेकॉर्ड मोडले, अवघ्या 48 चेंडूत शतक
भारताच्या ऋषभ पंतचं वेगवान अर्धशतक, अंडर-19 विश्वचषकात विक्रम!
अनुभवामुळे पार्थिव पटेलची निवड : अनिल कुंबळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement