एक्स्प्लोर
ऋषभ पंत वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन थेट मैदानात
बंगळुरु : दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारच्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 15 धावांनी हार स्वीकारावी लागली, पण या सामन्यात दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी ऋषभ पंतनं दिलेली झुंज, किंबहुना या सामन्यात खेळण्याचं त्यानं दाखवलेलं धैर्य याचं भारतीय क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे.
ऋषभ पंतचे वडील राजेंद्र यांचं बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झालं. त्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमवेत असलेला ऋषभ तातडीने घरी परतला.
वडीलांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करून तो शुक्रवारी पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सामील झाला. खरं तर सतत प्रसन्न राहणारा, मित्रांची थट्टामस्करी करणारा ऋषभ दोन दिवसांत खूपच बदलला होता. तो अबोल आणि गंभीर झाला होता. पण त्याच्यातली झुंजार वृत्ती कायम असल्याचा अनुभव सलामीच्या सामन्यात आला.
ऋषभने या सामन्यात 36 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 57 धावांची खेळी उभारली. ऋषभच्या या झुंजार खेळीला विजयाचं समाधान लाभलं नाही. पण या खेळीने त्याची परिपक्वता भारतीय क्रिकेटसमोर आली.
ऋषभ पंतच्या कठोर संघर्षानंतरही बंगळुरूतल्या आयपीएल सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. शेन वॉटसनच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 15 धावांनी पराभव करून यंदाच्या मोसमातला आपला पहिला विजय साजरा केला.
केदार जाधव बंगळुरुच्या या विजयाचा शिल्पकार खरा शिल्पकार ठरला. त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 69 धावांची खेळी करून बंगळुरुला 20 षटकांत आठ बाद 157 धावांची मजल मारून दिली होती.
ऋषभ पंतने 36 चेंडूंत 57 धावांची खेळी करून त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण अखेरच्या षटकात पवन नेगीने पंतचा त्रिफळा उडवला आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव निश्चित झाला.
सचिनच्या प्रसंगाची आठवण
ऋषभ पंतच्या धैर्यशील खेळीनंतर सर्वांनाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळीची आठवण झाली. 1999 सालच्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात सचिन वडिलांच्या निधनानंतरही टीम इंडियासाठी खेळला होता. केनियाविरुद्ध खेळलेल्या त्या सामन्यात सचिनने शतक झळकावून ते शतक वडिलांना समर्पित केलं होतं.
संबंधित बातमी : RCBvsDD : ऋषभ पंतची झुंज अपयशी, दिल्लीचा 15 धावांनी पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement