एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या धावपटूपेक्षा पॅरालिम्पिकपटू वेगवान
रिओ डि जनैरो : ऑलिम्पिक स्पर्धांच्या तुलनेत अपंग क्रीडापटूंचा सहभाग असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. मात्र यंदा रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकवलेल्या धावपटूच्या तुलनेत रिओ पॅरालिम्पिकमधील तब्बल चार धावपटूंचा वेग अधिक असल्याचं समोर आलं आहे.
अल्जेरियाच्या अब्देलतीफ बाकाने पुरुषांच्या 1500 मीटर ची टी13 श्रेणीची शर्यत 3 मिनिटं 48.29 सेकंदांत पूर्ण केली. ही विक्रमी वेळ नोंदवणाऱ्या बाकाने इथियोपियाचा तमिरु डेमिस, केनियाचा हेन्री किरवा आणि भाऊ (अल्जेरिया) फौद बाकाला मागे टाकलं.
महत्त्वाची बाब म्हणजे दृष्टीदोष असलेल्या स्पर्धकांच्या या शर्यतीतील या चारही खेळाडूंनी रियो ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर रेस धावणाऱ्या धावपटूला लागलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण केली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा धावपटू मॅथ्यू सँट्रोवित्झ ज्युनियरने 1500 मीटर धावण्याची शर्यत 3 मिनिटं 50 सेकंदात पूर्ण केली होती. ही वेळ पॅरालिम्पिकमधील 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानी असलेल्या फौद बाकाच्या तुलनेतही (3 मिनिटं 49.59 सेकंद) जास्त आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement