एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक : सलग तिसऱ्या पराभवाने महिला हॉकी संघ तळाला
मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं भारतीय महिलांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
या सामन्यात अमेरिकेनं भारतावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. कॅथलिन बॅमनं 14 व्या मिनिटाला गोल करुन अमेरिकाचं खातं उघडलं. त्यानंतर कॅथलिननेच 42 व्या मिनिटाला गोल डागून अमेरिकाची आघाडी 2-0 अशी वाढवली.
मेलिसा गोन्झालेझनं 52 व्या मिनिटाला गोल झळकावून अमेरिकाचा 3-0 असा विजय निश्चित केला. भारतीय महिलांचा चार सामन्यांमधला हा तिसरा पराभव ठरला आहे. या पराभवामुळे ब गटात भारतीय महिला संघ तळाशी फेकला गेला आहे. भारतीय महिलांचा अखेरचा सामना अर्जेन्टिनाशी खेळवला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement