एक्स्प्लोर
माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं: नरसिंग यादव
रिओ दी जेनेरिओ: भारताचा पैलवान नरसिंग यादवचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. कारण क्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.
या सर्व प्रकारानंतर पहिल्यांदाच नरसिंगची प्रतिक्रिया आली आहे. नरसिंग म्हणाला की, 'क्रीडा लवादच्या निर्णयानं मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे. मागील दोन महिन्यापासून मी बरंच काही सहन केलं. पण देशासाठी खेळायचं या एकाच ध्येयानं मी तग धरुन होतो. पण माझ्या पहिल्या बाउटआधी अवघ्या 12 तासांपूर्वी देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं.
नरसिंगनं आपले प्रायोजक जेएसडब्ल्यू स्पोर्टसद्वारे याविषयी स्पष्टीकरण जारी केलं. 'मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी सारं काही करेन. माझ्या हातात आता तेवढंच शिल्लक आहे.' यासंबंधी आणखी काही पुरावे मिळाल्यास निर्णयावर समीक्षा करणारी याचिका दाखल करता येऊ शकते. असंही या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
'नरसिंग निर्दोष आहे आणि आम्ही त्याच्या या लढाईमध्ये त्याच्यासोबत आहोत.' असं जेएसडब्ल्यूकडून स्पष्ट करण्यात आलं.
उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.
25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाडानं नरसिंग यादवला क्लीनचिट दिली होती. पण आपल्याविरोधात कट रचल्याचं नरसिंग यादव क्रीडा लवादासमोर सिद्ध करु शकला नाही. त्यामुळं नरसिंग यावर बंदीची कारवाई करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement