IPL 2020 : तेवतियाचे पाच षटकार, सिक्सरकिंग युवी म्हणतो, 'भावा, एक चेंडू मिस केल्याबद्दल थँक्स!'
राहुल तेवतियाने कार्टेलला एका षटकात पाच षटकार ठोकले. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याला खास शुभेच्छा मिळाल्या त्या सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंहकडून.
![IPL 2020 : तेवतियाचे पाच षटकार, सिक्सरकिंग युवी म्हणतो, 'भावा, एक चेंडू मिस केल्याबद्दल थँक्स!' Rahul tewatia 5 sixes in an over Sixer king yuvraj singh reaction tweet IPL 2020 : तेवतियाचे पाच षटकार, सिक्सरकिंग युवी म्हणतो, 'भावा, एक चेंडू मिस केल्याबद्दल थँक्स!'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/28174409/IPL.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RR vs KXIP : आयपीएल 2020 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा चार विकेट्सने पराभव केला. राजस्थानच्या या विक्रमी विजयाचे शिल्पकार ठरले संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया. या सामन्यानंतर विशेष चर्चेत राहिला तो राहुल तेवतिया. त्याने कार्टेलला एका षटकात पाच षटकार ठोकले. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात त्याला खास शुभेच्छा मिळाल्या त्या सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या आणि एका षटकात सहा सिक्सर ठोकणाऱ्या युवराज सिंहकडून.
तेवतियाने एकाच षटकात पाच षटकार लगावल्यानंतर युवराज सिंगने एक मजेशीर ट्विट केलं. “मिस्टर राहुल तेवतिया, ना भाई ना.. ओव्हरमधल्या त्या एका चेंडूवर षटकार न मारल्याबद्दल धन्यवाद! सामना अत्यंत अप्रतिम झाला. राजस्थान… तुमचं मनापासून अभिनंदन. मयंक अग्रवाल आणि संजू सॅमसन… तुमच्या खेळी अप्रतिम होत्या”, असे ट्विट त्याने केले.
Mr @rahultewatia02 na bhai na ???? thanks for missing one ball ! What a game congratulations to rr for a spectacular win !!! #RRvKXIP @mayankcricket great knock @IamSanjuSamson brilliant !
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 27, 2020
पंजाबच्या मयंक अग्रवालने दमदार शतक झळकावत 20 ओव्हरमध्ये तीन विकेट्स गमावत 233 धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं होतं. त्यानंतर हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाने संजू सॅमसन 85 धावा आणि राहुल तेवतिया 53 धावा या दोघांच्या दमदार खेळीने 3 चेंडू राखत सामना जिंकला. पहिल्यांदा मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवालने धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 16.3 ओव्हर्समध्ये 183 धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी ओपनिंग भागीदारी होती.
मयंकने 50 चेंडूंमध्ये 106 धावा आणि राहुलने 54 चेंडूंमध्ये 69 धावा काढल्या, 106 धावा काढणाऱ्या मयंक अग्रवालने आयपीएल 2020 मधील दुसरं शकत ठोकलं. मयंकने फक्त 45 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. कालच्या सामन्यात मयंकने एकूण 9 चौकार आणि 7 षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 222.22 एवढा होता.
मयंक अग्रवाल व्यतिरिक्त केएल. राहुलनेही 54 चेंडूंमध्ये 69 धावा काढत आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. यादरम्यान राहुलने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 9 चेंडूंमध्ये दोन चौकार लगावत नाबाद 13 आणि निकोलस पूरनने फक्त 8 चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 25 धावा काढल्या.
त्यानंतर पंजाबने दिलेल्या 224 धावांचं लक्ष्य भेदण्यासाठी राजस्थान रॉयल्स मैदानावर उतरली. राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. या सीझनमधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेला जोस बटलर सात चेंडूंमध्ये चार धावा काढत माघारी परतला.
त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने काउंटर अटॅक सुरु केला. सॅमसनने 42 चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 85 आणि स्मिथने 27 चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या.
परंतु, तरिही राजस्थानला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज होती. अशातच 21 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळणाऱ्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले आणि राजस्थानला विजय निश्चित झाला. तेवतियाव्यतिरिक्त जोफ्रा आर्चरनेही तीन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावत नाबाद 13 धावा केल्या आणि आपल्या संघाला रोमांचक लढतीत विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
मयांक अग्रवाल बनला आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)