Singapore Open 2022 : सिंधु-सायनाचं दमदार प्रदर्शन, दुसऱ्या फेरीत मिळवली जागा, प्रणॉयही विजयी
Singapore Open 2022 : नुकतीच सिंगापूर ओपन स्पर्धेला सुरुवात झाली असून पीयव्ही. सिंधू, सायना नेहवालसह, एचएस प्रणॉयने पहिल्या फेरीत विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे.
PV Sindhu Saina Nehwal Singapore Open 2022 : भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि सायना नेहवाल (Saina Nehwal) यांच्यास एचएस प्रणॉयने (HS Pranoy) बुधवारी झालेल्या सिंगापूर ओपन 2022 च्या पहिल्या फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह या तिघांनीही दुसऱ्या फेरीच प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांतने मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी सिंधूने जबरदस्त कामगिरी करत बेल्जियमच्या लियान टॅनला 29 मिनिटांच्या सामन्यात 21-15 आणि 21-11 च्या फरकाने मात देत विजय मिळवला.
भारतासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने जागतिक क्रमवारी 36 व्या नंबरवर असणाऱ्या बेल्जियमच्या लियान टॅनला दारुण पराभूत केलं. पहिल्या सेटमध्ये तिने 21-15 च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात आघाडी घेतली, ज्यानंतर दुसरा सेटही 21-11 च्या आणखी चांगल्या फरकाने जिंकत सामना नावे केला. आता सिंधूचा पुढील सामना व्हिएतनामच्या आणि जागतिक क्रमवारीत 59 व्या नंबरवर असणाऱ्या थू लिन्ह गुयेनशी असणार आहे. 212 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालने मालविका बंसोडा 21-18 आणि 21-14 च्या फरकाने मात देत दुसरी फेरी गाठली आहे. दुसरीकडे कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन पारुपल्ली कश्यपला इंडोनेशियाच्या जोनातन क्रिस्टीविरुद्ध 14-21 आणि 15-21 च्या फरकाने पराभूत झाली. दुसरीकडे अश्मिता चालिहाने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानला 21-16, 21-11 च्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला.
पुरुष सामन्यांत काय झालं?
पुरुष एकेरीमध्ये भारताच्याच मिथुन मंजूनाथने दिग्गज बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला 21-17, 15-21, 21-18 अशा तीन सेट्समध्ये मात दिली. तसंच भारताला थॉमस कप मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या एचएस प्रणॉयने थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनला 21-13, 21-16 च्या फरकाने मात देत विजय मिळला.
हे देखील वाचा-