एक्स्प्लोर

Jasprit Bumrah : इंग्लंडविरुद्ध कमाल कामगिरी, बुमराह आता जगातील नंबर 1 गोलंदाज

ICC ODI Rankings : एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजांची आयसीसी एकदिवसीय रँकिंग नुकतीच समोर आली असून यामध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध एका सामन्यात 6 विकेट्स मिळवल्या.

ICC ODI Bowler Rankings : भारताने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). त्याने सामन्यात तब्बल 6 विकेट्स घेतल्या, याच कामगिरीनंतर बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सध्या बुमराहच्या नावावर 718 गुण झाले असून त्याने न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टला (712 गुण) मागे टाकलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने अप्रतिम अशी गोलंदाजी करत 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. त्याने केलेल्या या कामगिरीच्या जोरावर तो पुन्हा एकदा एकदिवसीय गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.  बुमराहला फेब्रुवारी, 2020 मध्ये न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने पहिल्या स्थानावरुन हटवत अव्वलस्थान मिळवलं. त्याआधी दोन वर्षे तब्बल 730 दिवस बुमराह अव्वल स्थानी होता. इतक्या दिवस एक नंबरला असणारा बुमराह पहिला भारतीय तर क्रिकेट इतिहासातील नववा गोलंदाज ठरला होता. ज्यानंतर आता पुन्हा तो पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

टॉप 10 मध्ये एकमेव गोलंदाज

बुमराह आधीच टी20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असून बुमराह कसोटी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी असून एकदिवसीय रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचणारा कपिल देव यांच्यानंतर बुमराह दुसराच वेगवान गोलंदाज आहे. बुमराह शिवाय मनिंदर सिंह, अनिल कुंबळे आणि रवींद्र जाडेजा यांनीही पहिलं स्थान पटकावलं आहे. सध्या टॉप 10 मध्ये बुमराह एकमेव भारतीय गोलंदाज आहे. 

आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांची रँकिंग

क्रमांक गोलंदाज गुण
1 जसप्रीत बुमराह 718
2 ट्रेन्ट बोल्ट 712
3 शाहीन आफ्रिदी 681
4 जोश हेझलवुड 679
5 मुजिब उर् रेहमान 676
6 मेहिदी हसन मिराज 675
7 ख्रिस वोक्स 673
8 मॅट हेन्री 672
9 मोहम्मद नबी 657
10 राशिद खान 651

 हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10AM: 14 May 2024: ABP MajhaTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Embed widget