एक्स्प्लोर
FIFA 2018 : पोलंड जिंकलं, पण जपानला बाद फेरीचं तिकीट मिळालं
पोलंड जपानवर 1-0 अशी निसटती मात करून, विश्वचषकाच्या रणांगणात आपला पहिला विजय साजरा केला.
मॉस्को : पोलंड जपानवर 1-0 अशी निसटती मात करून, विश्वचषकाच्या रणांगणात आपला पहिला विजय साजरा केला. पण या विजयानंतरही पोलंडला केवळ तीन गुणांसह ह गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
विशेष म्हणजे या सामन्यातल्या पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट मिळालं. जपान आणि सेनेगल या दोन्ही संघांचे तीन सामन्यांमध्ये समसमान चार गुण झाले. त्यांचा गोलफरकही 4-4 असा समसमान राहिला. त्यात उभय संघांमधला सामनाही 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळं फेअर प्लेच्या निकषावर जपानला ह गटात दुसरं स्थान आणि बाद फेरीचं तिकीट देण्यात आलं.
विश्वचषकाच्या इतिहासात फेअर प्लेच्या निकषावर बाद फेरी गाठणारा जपान पहिला संघ ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement