'हॅलो, मी सायना नेहवालाचा नवरा...; पी. कश्यपने एमएस धोनीसमोर आपली ओळख सांगितली अन्...
Parupalli Kashyap And MS Dhoni: पारुपल्ली कश्यपने एका लग्नात महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर नेमकं काय झालं होतं, याबाबत खुलासा केला.
Parupalli Kashyap And MS Dhoni: भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई कऱणारा पारुपल्ली कश्यप हा भारताची माजी पहिल्या क्रमांकाची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालशी (Saina Nehwal) लग्न केलं आहे. पारुपल्ली कश्यप आणि सायना नेहवालने एका पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी पारुपल्ली कश्यपने एका लग्नात महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर नेमकं काय झालं होतं, याबाबत खुलासा केला.
पी. कश्यप नेमकं काय म्हणाला?
मी नुकतंच एका लग्नात धोनीला भेटलो. मी सायना नेहवालचा नवरा म्हणून माझी ओळख करून दिली. यावर एमएस धोनीने आश्चर्यकारक उत्तर दिलं. मी क्रिकेट आणि धोनीचा चाहता आहे. त्यामुळे जेव्हा मी धोनीला भेटलो, तेव्हा तो म्हणाला, मला माहिती आहे, भाऊ...मी बॅडमिंटन खेळतो आणि तू सायना नेहवालचा नवरा आहेस हे सांगायची गरज नाही, असं धोनी म्हणाला. तसेच तो माझ्याशी मित्रासारखा बोलला, जणू काही मी त्याचा टीममेट आहे, असं पी. कश्यपने सांगितले.
Parupalli Kashyap about an incident when he met MS Dhoni in Ambani’s pre-wedding. pic.twitter.com/b3sf5sPMmb
— ` (@WorshipDhoni) July 12, 2024
दरम्यान, एमएस धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी आणि चेन्नई सुपर किंग्जला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. धोनीने दीड दशकाच्या कालावधीत 350 एकदिवसीय सामने खेळले आणि 50.58 च्या सरासरीने 10,773 धावा जमवल्या. कसोटी क्रिकेटमध्ये, त्याने 90 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 38.09 च्या सरासरीने 5000 च्या जवळपास धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने नुकताच त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, धोनी फक्त इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. दुसरीकडे, कश्यपला ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरल्यानंतर 2012 मध्ये सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्येही कश्यपने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात क्रिकेटपटूंची मांदीयाळी-
हार्दिक पंड्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात आपला भाऊ कृणाल पंड्या आणि मित्र इशान किशनसोबत पोहोचला होता. लग्नात अनन्या पांडे देखील सहभागी झाली होती. या लग्नाला इतर अनेक क्रिकेटर्सनीही हजेरी लावली होती. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'