एक्स्प्लोर

Qatar World Cup : कतारनं करून दाखवलं, मोरोक्कोनं मने जिंकली, सौदीनं रोनाल्डोला घेऊन दाखवलं! मुस्लीम देशांमध्ये 'खेळक्रांती' होत आहे का?

Qatar World Cup : कतारला लक्ष्य करण्यात पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या नेहमीच्या सवयींनी 12 वर्षांपासून कोणतीही कसर ठेवली नव्हती. पाश्चिमात्य माध्यमांनी सुद्धा जहरी टीका करण्याची संधी सोडली नाही.

Qatar World Cup : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने भयग्रस्त झालेल्या जगाला आणि काडीचाही सहभाग नसलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशाला कतारमध्ये झालेल्या फुटबाॅल वर्ल्डकपने मनमुराद असा आनंद दिला. फिफाच्या इतिहासात आजवर कधीही झाला नाही असा रोमाचंक अंतिम महामुकाबला झाला. जगभरातील चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या लिओनेल मेस्सीने उंचावलेला वर्ल्डकप यामुळे कतारमधील फुटबाॅल वर्ल्डकप अविस्मरणीय असा झाला. हा रोमांचक घटनाक्रम इतकाच नाही, तर सौदी अरेबियाने पहिल्याच सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाला दिलेला अनपेक्षित दणका, आफ्रिकन देश असलेल्या मोरोक्कोची स्वप्नवत कामगिरी सर्व विसरून अरब जगताला रस्त्यावर उतरून जल्लोष करायला लावणारी ठरली. 

या सर्व कामगिरीवर आणि घटनांवर नजर टाकल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी मुस्लीम देश होते. गेल्या दशकभरापासून अरब राष्ट्रे अरब स्प्रिंग चळवळीने स्थित्यंतरातून जात आहेत. त्यामुळे अनेक रक्तरंजित संघर्ष झाले आहेत आणि आजही होत आहेत. मात्र, फुटबाॅलने त्यांना काहीसा आनंद मिळाला. खेळाला जात, धर्म, पंथ नसतो असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे आनंद साजरा करताना हे प्रकर्षाने अरब राष्ट्रांमध्ये दिसून आले. 

Image

कतारला यजमानपद दिल्यापासून वादाची मालिका 

सर्व टीकाकारांना आपल्या नियोजनातून आणि जगभरातून आलेल्या प्रेक्षकांना दिलेल्या आदरातिथ्यामधून कतारवर होत असलेल्या आरोपांमधील हवा निघाली. कतारला लक्ष्य करण्यात पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या नेहमीच्या सवयींनी गेल्या 12 वर्षापासून कोणतीही कसर ठेवली नव्हती. अरब देशांमधील प्रखर उष्णता हे सुद्धा त्यामागे प्रमुख कारण होते. 

पाश्चिमात्य माध्यमांनी जहरी टीका करण्याची संधी सोडली नाही. कार्टूनमधूनही खिल्ली उडवण्यात आली. हा प्रवास इतक्यावर थांबला नाही. इंग्लंडमधील लेबर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी कतारमधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही सदस्याला पाठवणार नसल्याचे सांगितले. यावरून पाश्चिमात्यांचा मुस्लीम देशांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. यजमानपद मिळाल्यापासून कतारला टीकेला सामोरे जावे लागले. यामध्ये शेजारी असलेल्या बलाढ्य सौदी अरेबियाने राजनैतिक संबंध स्पर्धेची तयारी तोंडावर असतानाच तोडले होते. त्यामुळे फुटबाॅल आयोजनावर शंका व्यक्त केली जात होती. मात्र, चौफेर टीका, नाकेबंदी होऊनही कतारने स्वप्नवत नियोजन करून सर्वांची बोलती बंद केली. 

अरब देशांमधील खराब मानवी हक्कांमुळे कतार वर्ल्डकपवर जोरदार टीका झाली असली तरी फिफाला मोठे व्यावसायिक यश मिळाले आहे. फिफाला 6.2 बिलीयन युरो महसूल मिळाला आहे. यामध्ये मागच्या वर्ल्डकप आयोजनाच्या तुलनेत 840 मिलियन युरो अधिक आहे. यावरून कतारने केलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. 

लिओनेल मेस्सीला सन्मानाचा बिष्टही अर्पण केला 

मेस्सीच्या हाती वर्ल्डकप सोपवत असतानाच कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांनी एक पारंपारिक अरबी बिष्ट (a bisht, a traditional Arab cloak) अर्पण केला. शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (FIFA President Gianni Infantino) यांच्याकडून ट्रॉफी घेण्यापूर्वी तो बिष्ट खांद्यावर ठेवण्याची मेस्सीला परवानगी दिली. ज्याचा उद्देश मेस्सीचा सन्मान आणि एका प्रचंड यशस्वी जागतिक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी अरब राष्ट्रांमधील संस्कृतीचे प्रदर्शन करणे होते.

Image

अरब राष्ट्रांसाठी अविश्वसनीय वर्ल्डकप 

कतारमध्ये पार पडलेला फुटबाॅल वर्ल्डकप हा खरचं अरब जगतासाठी गौरवशाली ठरला. जो प्रथमच एका अरब मुस्लीम देशात आयोजित करण्यात आला. कतारची राजधानी दोहामध्ये, पॅलेस्टीनला सहानुभूती हे स्पर्धेचे निरंतर वैशिष्ट्य राहिले. अनेक मुस्लिमांसाठी, उद्घाटन समारंभात कुराणचे पठण पाहणे आणि ऐकणे मनापासून प्रेरणादायी होते. स्पर्धेच्या सुरुवातीस सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा केलेला पराभव केल्याने अनेक मुस्लीम देशांमध्ये सर्व मतभेद, मनभेद, रक्तरंजित इतिहास, राजकीय विभागणी ओलांडून आनंदाला उधाण आले. 

Image

मोरोक्कोचा स्वप्नवत प्रवास 

फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम चारमध्ये स्थान मिळवणारा अरब जगतातील पहिला संघ म्हणून मोरोक्कोचा स्वप्नवत प्रवास हा नक्कीच अनेक मुस्लीम देशांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. मुस्लीम देशांसाठी ही स्पर्धा ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणून अधोरेखित झाली आहे. युरोपियन देशांतील असंख्य चाहत्यांनी कतारमधील त्यांचा मुक्काम इस्लाम आणि कतारी संस्कृतीबद्दल जाणून घेणे, मशिदींना भेट देणे, नवीन मित्र बनवण्याची आणि पारंपारिक कपडे परिधान करण्याची संधी म्हणून स्वीकारल्याचे दिसून आले. कतारविरोधातील विखारी प्रचाराला हे सन्मानाने दिलेलं उत्तर होते. 

Africa and the Middle East united behind Morocco – DW – 12/07/2022

 

रोनाल्डो आला सौदी अरेबियात

कतारमधील यशस्वी सांगता, मोरोक्कोची सोनेरी कामगिरी आणि सौदीने अर्जेंटिनाचा केलेला पराभव हे होत असतानाचा स्टार फुटबाॅलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब AlNassr मध्ये सामील झाला. रोनाल्डोला कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असला, तरी त्याचा खेळातील करिष्मा आणि वलय आजही अबाधित आहे. 

Qatar World Cup : कतारनं करून दाखवलं, मोरोक्कोनं मने जिंकली, सौदीनं रोनाल्डोला घेऊन दाखवलं! मुस्लीम देशांमध्ये 'खेळक्रांती' होत आहे का?

रोनाल्डोच्या पोर्तुगालला वर्ल्डकपमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. रोनाल्डो युरोपमधील फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडचिट्टी देत सौदीत दाखल झाला आहे. रोनाल्डोसाठी AlNassr क्लबने 1800 कोटी मोजले आहेत. त्यामुळे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 ची आखणी केली असून त्यामध्ये खेळालाही सामील केलं आहे. वर्ल्डकपमध्ये सौदीचा विजय सुद्धा रोनाल्डोला करारबद्ध करण्यात मैलाचा दगड ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

मोहम्मद बिन सलमान म्हणतात...

पुढील पाच वर्षांत सौदी अरेबिया पूर्णपणे वेगळा असेल. बहरीन पूर्णपणे वेगळा असेल. अगदी कुवेत अगदी कतार त्यांच्याशी आमचे मतभेद असूनही. त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि येत्या पाच वर्षांत, संयुक्त अरब अमिराती, ओमान, लेबनॉन, जॉर्डन, इजिप्त, इराकमधील संधी साधण्यात येत्या पाच वर्षात जर आपण यशस्वी झालो तर अनेक देश आमच्या पावलावर पाऊल टाकतील. 2026 वर्ल्डकप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होत आहे. 

Image

कतारच्या तुलनेत सौदीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, भारतासह अगदी ईस्त्राईलसोबत घनिष्ठ द्विपक्षीय संबंध आहेत. त्यामुळे रोनाल्डोच्या माध्यमातून 2030 फुटबाॅल आयोजनाचे स्वप्न असेल यात शंका नाही. कतार करू शकतो, तर सौदी का नाही? ही भावना सुद्धा क्राऊन प्रिन्स सलमान यांना नक्की जाणवत असेल. येणारा काळ अनेक प्रश्नांची उत्तरे देणार असला, तरी मुस्लीम देशांमध्ये खेळाच्या माध्यमातून परिवर्तन होत असेल, तर स्वागत करायला हवे. धार्मिक सनातन्यांमुळे आणि पाश्चिमात्य देशांच्या स्वार्थाने अनेक मुस्लीम देश बेचिराख झाले आहेत. त्यामुळे या राखेतून भरारी घेण्यास खेळक्रांती मदत करणार असेल, तर स्वागत करायला हवे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajit Sawant PC : प्रशांत कोरटकर चिल्लर, हातावर तुरी देत पळून गेला असेल तर हे गृह खात्याचं अपयशABP Majha Headlines : 12 PM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 22 March 2025 :  ABP Majha : 12 PMPrashant Koratkar Photos : जुने फोटो टाकून पोलिसांची दिशाभूल? प्रशांत कोरटकरचा प्रशासनाला चकवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
जान्वही कपूर, विद्या बालन ते नेहा धुपियाचा ग्लॅमरस लूक, एका क्लिकवर
जान्वही कपूर, विद्या बालन ते नेहा धुपियाचा ग्लॅमरस लूक, एका क्लिकवर
KKR vs RCB :  एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव
केकेआरची साथ सोडलेल्या स्टारवरआरसीबी डाव लावणार, कोलकाताची नाकेबंदी करण्यासाठी बंगळुरुचं तगडं प्लॅनिंग
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Embed widget