Paris Olympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल धमाका, अवनी लेखराने नेमबाजीत गोल्ड मेडल पटकावलं, मोना अग्रवालची ब्राँझवर मोहोर
Paris Olympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी (दि.30) तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे.
Paris Olympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी (दि.30) तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे. याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे. अवनी लेखरा आणि मोना अग्रवालच्या कामगिरीमुळे भारताचं ऑलम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे.
दक्षिण कोरियाच्या ली युनरीने या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले
अवनीने फायनलमध्ये 249.7 गुण मिळवत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवनीने पॅरालिम्पिक 2020 मध्ये याच स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. दरम्यान, गोल्ड मेडल कायम राखण्यात तिला यश आलं आहे. दक्षिण कोरियाच्या ली युनरीने या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे. याशिवाय अवनीने टोक्यो ऑलम्पिक 2020 मध्ये 50 रायफल थ्री स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
अवनी लेखराने क्वालिफिकेशनमध्ये दुसऱ्या स्थानी जात अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वर्षापासून उत्तम कामगिरी करत असलेल्या मोना अग्रवालनेही पाचवे स्थान गाठत अंतिम फेरीत धडक मारली होती. गतवर्षी चॅम्पियन बनलेल्या अवनीने 625.8 स्कोर केला होता, त्यामुळे ती इरिना शचेतनिक पासून मागे पडली होती. इरिनाने 627.5 एवढा स्कोर केला होता.
आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस विश्वविजेत्या ठरलेल्या मोना अग्रवालने 623.1 स्कोर केला. अवनीने तीन वर्षापूर्वी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये एसएच 1 मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते, त्यामुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. कार अपघातात जखमी झाल्यानंतर अवनी सातत्याने व्हिलचेअरचा वापर करत होती. अपघातातून सावरत तिने पुन्हा एकदा गोल्ड मेडल पटकावण्याचा पराक्रम करुन दाखवलाय.
Avani Lekhara - the first ever Indian athlete to successfully defend her Gold Medal at the Paralympics. 🏅pic.twitter.com/zu6PuX9Hf1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 30, 2024
Brilliant start for Bharat at the #Paralympics2024 with Double Podium Finish!
— Raksha Khadse (@khadseraksha) August 30, 2024
Kudos to @AvaniLekhara for winning Gold Medal & Mona Agarwal for Bronze Medal in the R2 Women’s 10M Air Rifle SH1.
Your inspiring performances have made the nation proud. Keep shining!#Cheer4Bharat pic.twitter.com/lMVfGPy3A5
इतर महत्वाच्या बातम्या