'जबरदस्तीनं धर्मांतर...', पाकिस्तानी क्रिकेटपटूला हवंय भारतीय नागरिकत्व? म्हणाला, 'भारत मेरी मातृभूमी...'
Danish Kaneria: पाकिस्ताच्या माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने भारतीय नागरिकत्व मागितल्याच्या अनेक अफवा सध्या समाज माध्यमांवर पसरल्या होत्या. मात्र, आता स्वतः दानिश कनेरियाने आपले मत व्यक्त केले आहे.

Danish Kaneria on India Citizenship: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) हा सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतो, तो अनेकदा भारताशी संबंधित बाबींवरही आपले मत मांडतो. तो अनेकदा भारत-पाकिस्तान मुद्द्यांवर भारताचे उघडपणे समर्थन करतो. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोन हिंदू क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे आणि कनेरिया त्यापैकी एक आहे. भारतीय मुद्द्यांवर सतत लिहितानाही तो पाकिस्तानबद्दल का बोलत नाही? असे अनेक लोक कनेरियाला विचारतात.
अशातच, पाकिस्ताच्या या माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने भारतीय नागरिकत्व मागितल्याच्या अनेक अफवा सध्या समाज माध्यमांवर पसरल्या (Social Media Rumours) होत्या. मात्र, आता स्वतः दानिश कनेरियाने यावर सोशल मीडियावरील एका लांबलचक पोस्टमधून संपूर्ण प्रकरण स्पष्ट करत आपले मत व्यक्त केले आहे.
दानिश कनेरियाच्या पोस्टमधून नेमकं काय म्हणाला? (Danish Kaneria on Social Media after Rumours)
दानिश कनेरियाने त्याच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे कि, "अलीकडेच, मला अनेक लोकांना प्रश्न विचारताना पाहिले आहे कि, मी पाकिस्तानबद्दल का बोलत नाही, मी भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य का करतो आणि काही जण असा आरोपही करतात की मी हे भारतीय नागरिकत्वासाठी करतो. पण मला हे स्पष्ट करणे महत्त्वाचे वाटते. मला पाकिस्तान आणि तिथल्या लोकांकडून, विशेषतः त्यांच्या प्रेमासाठी खूप काही मिळाले आहे. पण त्या प्रेमासोबतच, मला पाकिस्तानी अधिकारी आणि पीसीबीकडूनही खोलवर भेदभावाचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न देखील समाविष्ट आहे."
Lately, I have seen many people questioning me, asking why I do not speak about Pakistan, why I comment on Bharat’s internal matters, and some even alleging that I do all this for Bharatiya citizenship. I feel it is important to set the record straight.
— Danish Kaneria (@DanishKaneria61) October 4, 2025
From Pakistan and its…
Danish Kaneria on India Citizenship: ...परंतु माझ्या पूर्वजांची, माझी मातृभूमी भारतच!
त्यांनी पुढे लिहिले आहे कि, "भारत आणि तिथल्या नागरिकत्वाबद्दल, मी पूर्णपणे स्पष्ट सांगू इच्छितो. पाकिस्तान माझी जन्मभूमी असू शकते, परंतु माझ्या पूर्वजांची भूमी भारत ही माझी मातृभूमी आहे. माझ्यासाठी भारत एका मंदिरासारखा आहे. सध्या, माझा भारतीय नागरिकत्व घेण्याची कोणतीही योजना नाही. जर माझ्यासारख्या एखाद्याने भविष्यात असे करण्याचा निर्णय घेतला तर, आमच्यासारख्या लोकांसाठी सीएए आधीच लागू आहे."
माझे भाग्य भगवान रामांच्या हातात आहे, जय श्री राम - दानिश कनेरिया
दानिश कनेरियाने पुढे लिहिले आहे कि, "म्हणून, जे लोक असा दावा करतात की माझे शब्द किंवा कृती नागरिकत्वाच्या इच्छेने प्रेरित आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मी धर्माच्या बाजूने उभा राहीन आणि आपल्या मूल्यांना हानी पोहोचवणाऱ्या आणि आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रद्रोही आणि बनावट धर्मनिरपेक्षतावाद्यांना उघड करत राहीन." "माझ्या सुरक्षिततेची काळजी करणाऱ्यांना, भगवान श्री रामांच्या आशीर्वादाने, मी माझ्या कुटुंबासह सुरक्षित आणि आनंदी आहे. माझे भाग्य भगवान रामांच्या हातात आहे. जय श्री राम."
हेदेखील वाचा


















