England vs Pakistan : सेमीफायनल टार्गेटसाठी करायच्या होत्या 38 बाॅलमध्ये 338 अन् झाल्या फक्त 30; पाकिस्तान वस्तीचं विमान पकडून आजच घरी जाणार
England vs Pakistan :पाकिस्तानला सेमीफायनल निश्चित करण्यासाठी हे आव्हान 38 चेंडूत गाठायचे होते, पण त्यांनी 2 बाद 30 अशी मजल मारल्याने औपचारिकपणे पाकिस्तान स्पर्धेतून बाद झाला.
कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या विश्वचषकाचा 44 वा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. हा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावा केल्या. पाकिस्तानला सेमीफायनल निश्चित करण्यासाठी हे आव्हान 38 चेंडूत गाठायचे होते, पण त्यांनी 2 बाद 30 अशी मजल मारल्याने औपचारिकपणे पाकिस्तान स्पर्धेतून बाद झाला. यामुळे टीम इंडियाची लढत मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध होईल.
Have a safe flight too. 😉👋 https://t.co/jZN1KwLGVW pic.twitter.com/SO770FUOiG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 337 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना केवळ 6.2 षटकांत म्हणजेच 38 चेंडूंत 338 धावा कराव्या लागणार होत्या. तरच त्यांचा संघ न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्य फेरी गाठू शकणार होता.
INDIA VS NEW ZEALAND AT THE WANKHEDE STADIUM ON 15TH OCTOBER....!!!! pic.twitter.com/zO9dc5lCwi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
अशा परिस्थितीत समजा पाकिस्तान संघाने पहिल्या 40 चेंडूत 40 षटकार ठोकले तरी त्यांचा संघ मागे राहणार होता. अशा स्थितीत पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडला पराभूत करून विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
2003 WC - Couldn't qualify into Semis.
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
2007 WC - Couldn't qualify into Semis.
2015 WC - Couldn't qualify into Semis.
2019 WC - Couldn't qualify into Semis.
2023 WC - Couldn't qualify into Semis.
Pakistan is one of the most under performing teams in WC history. pic.twitter.com/fKsezvoI2h
मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी केली आहे. आज इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील सर्व फलंदाजांनी योग्य धावा केल्या आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा केल्या. स्टोक्सने 82 धावांची इनिंग खेळली, तर जो रुटचा फॉर्मही परत आला.जो रुटने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये 60 रन्सची इनिंग खेळली होती. जॉनी बेअरस्टोने 59, डेव्हिड मलान 31, हॅरी ब्रूक 30, जोस बटलर 27 आणि शेवटी डेव्हिड विलीने अवघ्या 5 चेंडूत 15 धावांची खेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या