एक्स्प्लोर
डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने क्रिकेटरचा मृत्यू
पाकिस्तानातल्या स्थानिक क्रिकेटमधल्या एका दुर्दैवी घटनेत, डोक्यावर बाऊन्सर आदळल्यानं झुबैर अहमद या फलंदाजाचा भर मैदानाताच मृत्यू झाला.

कराची : पाकिस्तानातल्या स्थानिक क्रिकेटमधल्या एका दुर्दैवी घटनेत, डोक्यावर बाऊन्सर आदळल्यानं झुबैर अहमद या फलंदाजाचा भर मैदानाताच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मरदान शहरातल्या एका स्थानिक सामन्यात घडली. झुबैर अहमद हा क्वेट्टा बीअर्स या ट्वेन्टी20 संघाचं प्रतिनिधित्व करायचा. तो लिस्ट ए दर्जाच्या चार सामन्यांमध्ये खेळला होता. फलंदाजानं हेल्मेट परिधान करणं आवश्यक असल्याचं झुबैर अहमदच्या दुर्दैवी मृत्यूनं पुन्हा सिद्ध झालं असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. 2014 साली ऑस्ट्रेलियातल्या शेफिल्ड शिल्ड सामन्यात फिलिप ह्यूज या कसोटीवीराचा बाऊन्सर डोक्यावर आदळून मैदानातच मृत्यू झाला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या रविवारच्या सराव सामन्यात जोश हेडलवूडचा बाऊन्सर मानेवर आदळल्यानं डेव्हिड वॉर्नरला निवृत्त व्हावं लागलं. https://twitter.com/TheRealPCB/status/897690020236099586
आणखी वाचा























