एक्स्प्लोर
ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय खेळाडूला एक लाख, सलमानची घोषणा
मुंबईः ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या खेळाडूंना दाद देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे सरसावला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला एक लाख एक हजार रुपयांचा चेक देणार असल्याचं सलमानने ट्विटरवरून जाहीर केलं आहे.
खेळाडूंना मदत करणाऱ्या ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट सारख्या संघटनांचे सलमानने आभार मानले आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात आयओएने सलमानची ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली होती.
सलमान खान सध्या आगामी 'ट्युबलाईट' सिनेमाच्या शुटिंगसाठी लडाखमध्ये आहे. भाराताला पदक मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ऑलिम्पिक खेळाडूंना दबंग खानने दाद दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement