(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yogesh Kathuniya : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! थाळी फेकमध्ये योगेशने जिंकले रौप्यपदक
Yogesh Kathuniya Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे.
Paris Paralympics 2024 Yogesh Kathuniya : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. थाळी फेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या थाळी फेकमध्ये F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. योगेश कथुनियाचा पहिला थ्रो 42.22 मीटर होता. यानंतर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अनुक्रमे 41.50 मीटर, 41.55 मीटर, 40.33 मीटर आणि 40.89 मीटर होता.
27 वर्षीय योगेशने पहिल्याच प्रयत्नात 42.22 मीटर थाळी फेकली, जो त्याचा सर्वोत्तम प्रयत्न होता. या स्पर्धेत ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँटोस क्लाउडनीने सुवर्णपदक जिंकले. त्याने 46.86 च्या सर्वोत्तम थ्रोसह ही कामगिरी केली. बॅटिस्टाचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील या स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दुसरीकडे, ग्रीसच्या त्झोनिस कॉन्स्टँटिनोसने 41.32 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.
𝐌𝐄𝐃𝐀𝐋 𝐀𝐥𝐞𝐫𝐭: 𝐘𝐨𝐠𝐞𝐬𝐡 𝐊𝐚𝐭𝐡𝐮𝐧𝐢𝐲𝐚 𝐰𝐢𝐧𝐬 𝐒𝐢𝐥𝐯𝐞𝐫 𝐦𝐞𝐝𝐚𝐥 𝐢𝐧 𝐌𝐞𝐧'𝐬 𝐃𝐢𝐬𝐜𝐮𝐬 𝐓𝐡𝐫𝐨𝐰 𝐅𝟓𝟔 𝐚𝐭 𝐏𝐚𝐫𝐢𝐬 𝐏𝐚𝐫𝐚𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜𝐬 🔥
— India_AllSports (@India_AllSports) September 2, 2024
Its 2nd consecutive Paralympics Silver medal for Yogesh.
Its 8th medal for India #Paralympics2024 pic.twitter.com/JD3b0QRoCE
आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी योगेश कथुनियाने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. खरंतर, योगेश कथुनियाने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. अशा प्रकारे त्याने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी आत्तापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत.
#ParisParalympics2024 :
— All India Radio News (@airnewsalerts) September 2, 2024
Yogesh Kathuniya wins silver 🥈 in the Men's Discus Throw - F56 event with a season's best throw of 42.22m.#Cheer4Bharat | #ParalympicGamesParis2024 pic.twitter.com/iZZgpg0OZw
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते
- अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्यपदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
- निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्यपदक, पुरुष उंच उडी (T47)
- योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्यपदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
हे ही वाचा -