![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Wimbledon 2021: विजयानंतर टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबत शेअर केला फोटो
सानिया मिर्झाच्या या फोटोला तिचे चाहते खूप लाईक करत आहेत. यासोबतच सर्व सेलेब्रिटीही या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
![Wimbledon 2021: विजयानंतर टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबत शेअर केला फोटो Wimbledon 2021: After victory Sania Mirza shared a special picture with her son izhaan, Anushka Sharma made a beautiful comment Wimbledon 2021: विजयानंतर टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या मुलासोबत शेअर केला फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/e62861e5352f40c2ee4451d2f401a698_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरी जिंकत दुसर्या फेरीत पोहोचल्यानंतर सानियाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह सर्व सेलेब्स तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.
या फोटोत सानियाचा मुलगा इझान स्माईल करताना दिसत आहे. तसेच सानिया आणि बेथानी मॅटेक सँड्ससुद्धा खूप आनंदात दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने या फोटोवर "खूपच सुंदर." अशी कमेंट केली आहे. अनुष्काशिवाय अभिनेत्री गौहर खान आणि गायक नीती मोहन यांच्यासह सर्व मोठ्या सेलिब्रिटी या फोटोवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
सानिया मिर्झाच्या या फोटोला तिचे चाहते खूप पसंती देत आहेत. बातमी लिहिण्यापर्यंत एक लाख 52 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक्स केलं होतं. सोबतच कमेंटचाही पाऊस पडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)