Tokyo Olympics 2020: मनु भाकरने निराशाजनक कामगिरीवर मौन सोडले; माजी प्रशिक्षकाला दिला दोष
Tokyo Olympics 2020: मनु भाकर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी एकही पदक जिंकू शकली नाही. मनु भाकरने माजी प्रशिक्षकाला तिच्या निराशाजनक कामगिरीसाठी जबाबदार धरले आहे.
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाजीत कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. मनु भाकरकडून तीन स्पर्धांमध्ये भारताला पदकाची अपेक्षा होती. पण मनु भाकर कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरू शकली नाही. मनु भाकरने तिच्या खराब कामगिरीवर आपले मौन सोडले आहे आणि पराभवाचे खापर माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यावर फोडले आहे.
मनु भाकर टोकियोहून भारतात परतली आहे. मनु भाकर म्हणाली की ती वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल आणि 25 मीटरसह तिन्ही स्पर्धांमध्ये खेळत राहील. पहिल्या ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीतून ती जोरदार पुनरागमन करेल असा दावा मनु भाकरने केला आहे.
मनू भाकर हिने सांगितले की, माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी झालेल्या वादामुळे तिची ऑलिम्पिकसाठीची तयारी प्रभावित झाली होती. राणा यांनी तिला 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतून आपले नाव मागे घेण्यास सांगितले होते. मनू भाकरने स्पष्ट केले आहे की ती 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत खेळत राहील.
मनू भाकर म्हणाली की, नकारात्मकता आणि राणासोबत वाद झाल्याने कोणत्याही परिस्थितीत पदक जिंकण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे परिस्थिती बिकट झाली. मनूने सांगितले की, तिला 25 मीटर स्पर्धेतून माघार घेण्यास वारंवार सांगितले गेले.
मनु भाकरकडून चांगल्या कामगिरीचा दावा
म्यूनिखमध्ये ISSF विश्वचषकादरम्यान मनुने टोकियो ऑलिम्पिकचा हा कोटा मिळवला होता. ते म्हणाले, "नकारात्मकता होती कारण माझ्या पालकांनाही या संपूर्ण प्रकरणात सामील होण्यास भाग पाडले गेले. नकारात्मकतेमुळे भोपाळमध्ये प्रशिक्षणादरम्यान माझ्याबरोबर माझे आई-वडील का आहेत? अशी विचारणा करण्यात आली होती.
मनु म्हणाली की जसपाल राणा तिला येणाऱ्या अडचणी सोडवत नव्हते. वादानंतर भारताचे माजी नेमबाज रौनक पंडित यांना मनू भाकरचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलं. मनु भाकर म्हणाली, की "एनआरएआयने या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला विश्वासातही घेतले."
मनूने सांगितले की, पहिल्या ऑलिम्पिक अनुभवातून तिने बरेच काही शिकले आहे जे भविष्यात उपयोगी पडेल. या शूटरने सांगितले की, या अनुभवामुळे ती भविष्यात कठीण परिस्थितींना चांगल्या प्रकारे तोंड देण्यास सक्षम होईल.