एक्स्प्लोर

Tokyo Olympics 2020 : पदकाच्या दावेदारांकडून निराशा, अतानू, अमित पंघाल, सीमा पुनियाचं आव्हान संपुष्टात, सिंधूच्या कामगिरीकडे लक्ष

Tokyo Olympics 2020 LIVE :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कमलप्रीत कौरची कामगिरी वगळता भारताला पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली.

Tokyo Olympics 2020 LIVE :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरची कामगिरी वगळता भारताला पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली.  डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. तर तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

कमलप्रीत कौरनं इतिहास रचला
डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे.  कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे.   डिस्कस थ्रो प्रकारात कमलप्रीत कौरनं कमालीची कामगिरी केली. ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर स्कोअर केला. पहिल्या प्रयत्नात तिनं  60.25 मीटर   स्कोअर करण्यात यशस्वी ठरली होती. दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे. 

डिस्कस थ्रो- सीमा पूनिया बाहेर
डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.  सीमा पूनिया फायनलसाठी क्वालीफाय करु शकली नाही. क्वालिफिकेशन राउंडमध्ये सीमा पुनिया 16 व्या नंबरवर राहिली, यामुळं तिचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास थांबला आहे.  

बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा
बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. अमितनं पहिला राऊंड जिंकला होता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तो पराभूत झाला. अमित पंघालकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र त्याचा टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान या पराभवासह संपुष्टात आलं आहे.  

तिरंदाजीत अतानू दासचं आव्हान संपुष्टात  
तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा तिरंदाज अतानू दास  राउंड ऑफ 16 मध्ये पराभूत झाला आहे.  अतानु दास आणि जपानच्या खेळाडूमध्ये रंगलेला हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. शेवटच्या सेटमध्ये अतानूकडून एक चूक झाली आणि त्यानं सामना गमावला. अतानू दाससह भारताचे सर्व तीन तिरंदाज आधीच बाहेर गेले आहेत.  

पीव्ही सिंधु पदक निश्चित करणार
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्वाचा दिवस आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू मैदानात उतरणार आहे तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणीकडेही पदक निश्चित करण्याची संधी आहे. आज जर सिंधु तर ती फायनलमध्ये पोहोचेल आणि एक पदक निश्चित होईल. 

हॉकीत करो या मरोची स्थिती 
हॉकीमध्ये आज भारतीय महिलांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे. जर पराभव झाला तर भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकबाहेर जाईल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget