एक्स्प्लोर

Tokyo Olympics : सोनेरी शेवटासह भारतासाठी यंदाचं ऑलिम्पिक संपलं!

काल भारतासाठी ऑलम्पिक संपलं आहे. आपण पदकाच्या बाबतीत 2012च्या लंडन ऑलिम्पिकच्या सहा पदकांची संख्या ओलांडून ती सात अशी केली आहे. आजवरचं आपलं सर्वात यशस्वी ऑलम्पिक म्हणायला हरकत नाही

Tokyo Olympics : टोकियो ऑलम्पिकमधून आपल्याला किमान सहा पदकं मिळतील अशी खात्रीलायक अपेक्षा होतीच आणि कालचे तिन्ही इव्हेंट हे मेडल मिळवण्याचे इव्हेंट असल्याने शेवटचा दिवस गोड होईल ही रास्त अपेक्षा पोस्टमध्ये व्यक्त केली होती आणि कालचा दिवस भारतीय ऑलम्पिक इतिहासासाठी काय भारी दिवस ठरलाय!

ऑलम्पिकची सुरुवात सिल्वर मेडलने झाली आणि शेवट सोनेरी झाला हे सुवर्णपदक शेवटच्या दिवशी आणि आपल्या शेवटच्या इव्हेंटमध्ये आल्यामुळे एक प्रकारची पूर्णत्वाची भावना म्हणजेच Sense of Completion देणारा देखील ठरला आहे.

नीरज चोप्राच्या कामगिरीकडे येण्याआधी आदिती अशोकचा उल्लेख तर करावाच लागेल. परवाच गोल्फचे नियम कसे असतात हे समजून घेतल्यामुळे काल ते प्रत्यक्षात बघताना मजा आली आणि सतराव्या होलच्या वेळेस आदितीची बर्डी एकदम थोडक्यात चुकल्यामुळे अखेर याच कारणामुळे ती चौथ्या स्थानावर राहिली.(हे काय असत त्यासाठी कालची पोस्ट बघा) पण पहिल्या स्थानावर असणारी nelly corda आणि जपानची दुसऱ्या स्थानावर राहिलेली इनामी मोने या जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि ते 28व्या स्थानावर आहेत तर जागतिक क्रमवारीत 200 व्या स्थानी असणारी आदिती ऑलिम्पिकमध्ये मात्र थेट चौथ्या स्थानावर आली ही गरुड झेप म्हणावी लागेल.

Neeraj Chopra: 'सुवर्णफेक' करणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधींच्या इनामासह 'ही' खास बक्षीसं

तुम्हाला आठवत असेल 2016 च्या ऑलम्पिक मध्ये जिम्नॅस्टिक मध्ये आपली दिपा कर्माकर देखील अशाच उत्तम कामगिरी नंतर देखील थोडक्‍यात चौथ्या स्थानावर राहिली होती पण तिने देखील हा प्रकार संपूर्ण देशाला माहिती करून दिला होता. त्याचप्रमाणे आज आदितीमुळे देखील असंख्य लोकांची गोल्फ सोबत तोंड ओळख झाली असेल आणि हेच तर ऑलिंपिक मधल्या आपल्या खेळाडूंचे खरे यश आहे.

( बाकी अवांतर सांगायचं झालं तर तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या न्यूझीलंडच्या लिडिया को  आणि जपानच्या गोल्फरचा tie झाल्यानंतर जो राऊंड झाला त्यावेळी तीन दाखवलेली खिलाडू वृत्ती ही खरच प्रशंसनीय होती)

चौथ्या स्थानावर राहिलेल्या आदिती नंतर दुपारी आपला कुस्तीपटू बजरंगने ब्रॉंझ मिळवत आजच्या दिवसापुरती म्हणाल तर आपली कामगिरी उंचावली. मागच्या राउंडप्रमाणे आज मात्र त्याच्या पायावर कुठलीही पट्टी वगैरे दिसत नव्हती आणि पहिल्या सेकंदापासूनच ज्या जोश आणि स्फूर्तीसाठी तो ओळखला जातो तो नैसर्गिक खेळ आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. मला तर त्याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करून जिंकलेल्या त्याच्या क्वार्टर फायनल पेक्षा आजच्या सामन्यातला खेळ उमदा वाटला. बजरंग कडून खरंतर सुवर्णपदकाची अपेक्षा होती पण असो पहिल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मिळवले म्हणल्यावर पुढे चालून कामगिरी उंचावण्याची नक्कीच संधी आहे.

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल?

आणि नंतर जे काही ऐतिहासिक झालं ते तर या देशाने पाहिलच आहे. नीरज चोप्रा हे नाव आता सगळ्याला माहीत झाल्याने तो कुठून आला, त्याचा संघर्ष कसा आहे हे अनेक ठिकाणी वाचायला मिळेलच. पण 2016साली त्याने केलेलं अंडर ट्वेंटी वर्ल्ड रेकॉर्ड हे ऑलिंपिकच्या कट ऑफ डेट नंतर जर नसतं तर आपल्याला त्याच्याकडून मिळालेल मेडल हे कदाचित पाच वर्ष आधीच पहायला मिळू शकल असत.

 बाकी नीरजबाबत प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याची देहबोली (बॉडी लॅंग्वेज) पात्रता फेरीच्या वेळेस देखील पहिल्या थ्रो मध्ये डायरेक्ट क्वालिफाय होताना त्याचा like a boss एटीट्यूड दिसत होता तोच आज देखील दिसून आला. त्याच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचं दडपण जाणवत नव्हतं आणि दुसऱ्या थ्रो नंतर तर त्याने भाल्याकडे वळून सुधा न बघता प्रेक्षकांना अभिवादन केलं त्यातच त्याचा आत्मविश्वास दिसून येत होता!!

पात्रता फेरीच्या दिवशीची त्याची मुलाखत वाचली होती त्यामध्ये त्याने टोकियो मधलं स्टेडियम हे बंदिस्त असल्यामुळे जमिनीलगत फारशी मोकळी हवा असत नाही हे लक्षात घेऊन आपण भालाफेक करताना तो जास्तीत जास्त फ्लॅट ठेवण्याची strategy केल्याच सांगितलं होतं. म्हणजेच बघताना सहज वाटणाऱ्या भालाफेक सारख्या प्रकारात असे कितीतरी बारकावे असतात आणि याच प्रकारात वर्ल्ड फेवरेट असलेला जर्मनीच्या जॉनस वेटरचं काय झालं हे आपण सर्वांनीच बघितल.

ऑलिम्पिकच्या आधी नीरज चोप्रा चांगला खेळाडू आहे पण तो काही मला हरवू शकत नाही असं भाष्य जॉनासन केलं होतं. असो ह्या सोनेरी शेवटा मुळे भारताचा ट्रॅक एन फिल्ड म्हणजेच धावण्याचे आणि भाला गोळा हातोडा थाळीफेक इत्यादी प्रकारच्या खेळातील पदकांचा दुष्काळ संपला आणि 1960 ला मिल्खासिंग 1984 ला पी टी उषा आणि 2004 ला अंजू जॉर्ज यांना पदकानं दिलेली हुलकावणी यावेळी आपल्या पदरी आली नाही आणि पोडीयम वर अखेर जण गण वाजलं!!

इतर वेळी ऑलम्पिक या क्रीडा प्रकारात फारसा रस न घेणाऱ्यांना कदाचित हे आश्चर्य वाटू शकत की आजवर 2008 ला अभिनव बिंद्रा वगळता आजवर आपल्याला कधीच वैयक्तिक प्रकारातलं गोल्ड मेडल मिळाल नव्हत. पण हेच आपल्या कामगिरीच आजवरच कटू वास्तव होतं.

बाकी काल भारतासाठी ऑलम्पिक संपलं आहे. पण आपण पदकाच्या संखेच्या बाबतीत 2012च्या लंडन ऑलिम्पिकच्या सहा पदकांची संख्या ओलांडून ती सात अशी केली आहे. म्हणून हे आजवरचं आपलं सर्वात यशस्वी ऑलम्पिक म्हणायला हरकत नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget