(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paris Olympics 2024 Today Schedule: पॅरिस ऑलिम्पिकचा चौथा दिवस; भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर
Paris Olympics 2024 Today Schedule: भारतीय बॉक्सरही आज ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
Paris Olympics 2024 Today Schedule पॅरिस: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारतीय संघाने आतापर्यंत एक कांस्यपदक जिंकले आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकच्या आज (30 जुलै) म्हणजेच चौथ्या दिवशी भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना आयर्लंडशी होणार आहे.
भारतीय बॉक्सरही आज ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. बॅडमिंटन आणि तिरंदाजीसारख्या स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी (30 जुलै) भारताचे वेळापत्रक काय असेल आणि कोणत्या वेळी भारतीय खेळाडू कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत ते जाणून घ्या...
पॅरिस ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी मंगळवारी भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-
शूटिंग-
पुरुष पात्रता: पृथ्वीराज तोंडैमन - दुपारी 12:30 वा
महिला पात्रता: श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी - दुपारी 12:30 वा.
10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक कांस्यपदक सामना: भारत (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग) विरुद्ध कोरिया - दुपारी 1 वाजता
हॉकी-
पुरुषांचा: भारत विरुद्ध आयर्लंड - सायंकाळी 4:45
तिरंदाजी
महिला वैयक्तिक 1/32 एलिमिनेशन फेरी: अंकिता भकट (सायंकाळी 5.15) आणि भजन कौर (सायंकाळी 5.30)
पुरुषांची वैयक्तिक 1/32 एलिमिनेशन फेरी: धीरज बोम्मादेवरा (रात्री 10.45)
बॅडमिंटन
पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध अल्फियान फजर आणि मुहम्मद रियान अर्दियांतो (इंडोनेशिया) - सायंकाळी 5:30 वा
महिला दुहेरी (ग्रुप स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध सेत्याना मापासा आणि अँजेला यू (ऑस्ट्रेलिया) - सायंकाळी 6:20 वाजता.
बॉक्सिंग
पुरुषांची 51 किलो 16 ची फेरी: अमित पंघल विरुद्ध पॅट्रिक चिन्येम्बा (झांबिया) - 7:15 वा.
महिलांची 57 किलो 32 ची फेरी: जास्मिन लॅम्बोरिया विरुद्ध नेस्टी पेटेसिओ (फिलीपिन्स) - रात्री 9:25
महिलांची 54 किलो 16 ची फेरी: प्रीती पवार विरुद्ध येनी मार्सेला एरियास (कोलंबिया) - दुपारी 1:20 (31 जुलै)
मनू भाकर भारताला दुसरं पदक मिळवून देणार?
मनू भाकरनं भारताला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं होतं. मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात उद्या मनू भाकर आणि सरबजीत यांना कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. याशिवाय 25 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारात मनू भाकर 2 ऑगस्टला सहभागी होणार आहे. मनू भाकर आणि सरबजीत यांनी पदक जिंकल्यास एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकवून देणारी पहिली खेळाडू ठरु शकते.