एक्स्प्लोर

Paris Olympics 2024: वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकला; 2 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला

Winston Benjamin son Rai Benjamin at Olympics 2024: राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे.

Winston Benjamin son Rai Benjamin at Olympics 2024: अमेरिका सलग अनेक वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. अमेरिकेच्या खेळाडूंनी सलग चार ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत अमेरिकेला अव्वल स्थानावर ठेवले आहे. यावेळी अमेरिकेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) 126 पदके जिंकली, ज्यात 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यापैकी राय बेंजामिन याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेत अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. राय बेंजामिन (Rai Benjamin) हा वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज विन्स्टन बेंजामिनचा (Winston Benjamin) मुलगा आहे.

राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या राय यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात क्रिकेट आणि अमेरिकन फुटबॉलपासून केली, परंतु नंतर त्यांनी ट्रॅक इव्हेंटवर लक्ष केंद्रित केले. राय बेंजामिनने 2013 वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप आणि 2015 वर्ल्ड रिलेमध्ये अँटिग्वा आणि बार्बुडाचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर ते यूएस ऍथलेटिक्समध्ये गेले. पॅरिसमधील सुवर्णपदकाव्यतिरिक्त, रायने 2019 आणि 2022 जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीतही रौप्यपदक जिंकले आहे.

रॉय बेंजामिनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली-

रॉय बेंजामिन यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने केवळ 400 मीटर हर्डल्समध्येच नव्हे तर 4x400 मीटर रिलेमध्येही सुवर्णपदक जिंकून अमेरिकेचा हिरो बनला.

विन्स्टन बेंजामिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी-

विन्स्टन बेंजामिन यांनी वेस्ट इंडिजकडून 21 कसोटी आणि 85 एकदिवसीय सामने खेळले. त्याने कसोटीत 61 आणि एकदिवसीय सामन्यात 100 बळी घेतले. एक प्रतिष्ठित क्रिकेटपटू म्हणून तो स्वत:ला प्रस्थापित करू शकला नसला तरी त्याने वेस्ट इंडिजसाठी अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये योगदान दिले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेंजामिन युवा क्रिकेटपटूंना कोचिंग आणि तयार करण्याकडे वळला.

मुलाच्या यशाबद्दल विन्स्टन बेंजामिन काय म्हणाले?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या मुलाच्या यशाबद्दल विन्स्टन बेंजामिन यांनी क्रिकबझसोबत बोलताना म्हणाले की, रॉय बेंजामिन खूप मेहनत घेतली होती. वैयक्तिक सुवर्ण जिंकणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्याने खरोखरच आश्चर्यकारक कामगिरी आहे, असं विन्स्टन बेंजामिन यांनी सांगितले. 

भारताने एकूण 6 पदके जिंकली-

पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत खेळवण्यात आली.  या स्पर्धेत जगभरातील 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताकडून एकूण 117 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले. 

संबंधित बातमी:

Video: मनू भाकर अन् नीरज चोप्राचं लग्न?; व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget