एक्स्प्लोर

"खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी", रौप्यपदकाच्या कमाईनंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया; सुवर्णपदकासाठी पुन्हा कसली कंबर!

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. तर सुवर्णपदक पाकिस्तानच्या भालाफेकपटूला मिळाले आहे.

पॅरिस : भारताचा स्टार भालाफेकपटू याने पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकाची कामगिरी केली होती. दरम्यान, रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने माझा खेळ संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे, असे म्हणत आगामी काळात त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी होईल, असे सूचित केले आहे. 

नीरज चोप्रा काय म्हणाला? 

रौप्यपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. "सध्या पदक मिळालं आहे. हातात तिरंगा आहे. मला खूप आनंद होत आहे. आणखी भरपूर काम करायचं बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल," अशा भावना नीरजने व्यक्त केल्या.

अजून खेळ संपलेला नाही, भरपूर काही बाकी आहे

तसेच पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने भाला फेकल्यानंतर मला मनातून वाटत होतं की आपण हे करू शकतो. मी आतापर्यंत 90 मीटरपर्यंत भाला फेकलेला नाही.पण मी हे करू शकतो असं मला अंतर्मनातून वाटत होतं. मी 89 मीटरपर्यंत भाला फेकू शकलो. माझी ही कामगिरी काही कमी नाही. पण तेच सांगतोय की खेळ अजून संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे. ज्याने सुवर्णपदक पटकावले त्याने मेहनत केली आहे, त्याच्या कामगिरीचे कौतुक करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by Olympic Khel (@olympickhel)

नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

नीरज चोप्राच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. नीरजच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. नीरज पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करित राहील, असं मोदी म्हणाले. तर नीरजच्या या कामगिरीवर त्याची आई सरोज देवी यांनीदेखील आनंद व्यक्त केलाय. नीरज घरी आल्यावर मी त्याला त्याच्या आवडीचे जेवण खायला देणार आहे. त्याला मिळालेल्या पदकामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. ज्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं, तोदेखील माझ्या मुलासारखाच आहे, असे सरोज देवी म्हणाल्या.

हेही वाचा :

Neeraj Chopra : भारताल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्यपदक, नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी

"ज्याला सुवर्ण मिळालं, तोही माझा मुलगा", नीरज चोप्राच्या आईची मन जिंकणारी प्रतिक्रिया!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 : ABP MajhaFatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget