Neeraj Chopra : भारताल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्यपदक, नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी
Neeraj Chopra : भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे.
पॅरिस : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics)अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडक दिली होती. भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात होती. अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. अर्शद नदीमनं टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटर होता, त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले. यामुळं नीरज चोप्रानं रोप्य पदक जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं.
नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या. नीरज चोप्रानं पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. नीरज चोप्राचा हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलेला. यामुळं भारतातील कोट्यवधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या.
नीरज चोप्रानं पात्रता फेरीत सर्वात लांब म्हणजेच 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला होता. भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत झेक प्रजासत्ताकचा याकूब वालेश, जर्मनीचा ज्यूलियन वेबर आणि ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सचं देखील आव्हान होतं. अँडरसन आणि याकूब यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी 90 मीटर आहे. नीरज चोप्राचा सर्वोत्कृष्ट थ्रो 89.94 मीटर आहे. नीरज चोप्रासमोर पाकिस्तानच्या अर्शद नदीमच देखील आव्हान असेल.
नीरज समोर प्रमुख आव्हान असलेल्या अँडरसन पीटर्सनं पहिल्या प्रयत्नात 85 मीटर पेक्षा कमी अंतरावर पहिला थ्रो टाकला.त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या वॉलकॉटनं पहिल्या प्रयत्नात 86.16 मीटर भाला फेकला. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जर्मनीच्या वेबरचा पहिला प्रयत्न देखील अपयशी ठरला. केनियाच्या येगोनं पहिल्या प्रयत्नात 80.29 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं पहिला थ्रो फाऊल टाकला.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. जर्मनीच्या वेबरनं दुसऱ्या प्रयत्नात 87.33 मीटर थ्रो टाकला. केनियाच्या येगोनं दुसऱ्या फेरीत 87.72 मीटर थ्रो टाकला.नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो टाकला. नीरज तिसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नासारखी कामगिरी करु शकला नाही तर चौथा प्रयत्न फाऊल गेला.नीरज चोप्रानं पहिल्या पाच प्रयत्नांपैकी केवळ दुसरा योग्य ठरला तर इतर चार प्रयत्न लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं शेवटचा थ्रो 91 मीटर पेक्षा अधिक टाकला.
संबंधित बातम्या :