एक्स्प्लोर

Manu Bhaker : लग्नाच्या प्रश्नावर मनू भाकर क्षणभर लाजली नंतर हसली अन् नीरज चोप्राबाबत म्हणाली, आमची भेट...

Manu Bhaker : नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मनू भाकरनं भारताला दोन कांस्यपदकं मिळवून दिली होती.  तर, नीरज चोप्रानं रौप्य पदक मिळवलं होतं.

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मनू भाकरनं (Manu Bhaker) मिळवून दिलं. मनू भाकरनं नेमबाजीत दोन कांस्य पदकं मिळवली. यामुळं तिची देशभर चर्चा झाली. दुसरीकडे भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) यावेळी रौप्यपदक मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे मनू भाकर आणि तिच्या आईसोबत चर्चा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले अन् दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. मनू भाकरच्या वडिलांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मनू भाकरनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्राबरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. 

मनू भाकरनं न्यूज-18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मनू भाकरला नीरज चोप्रासोबतच्या लग्नाबाबतच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना मनू भाकरची प्रतिक्रिया चर्चेत आहे. नीरज शर्माबाबतच्या प्रश्नावर मनू भाकर पहिल्यांदा लाजली, यानंतर हसली आणि उत्तर दिलं. नीरज चोप्रा आणि माझी जादा बातचीत होत नाही.आम्ही एखाद्या स्पर्धेत अन् इव्हेंटमध्ये भेटतो. ज्या चर्चा आहेत तसं काही नाही, असं मनू भाकर म्हणाली होती. मनू भाकरनं नीरज चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र, मनू भाकर नीरज चोप्राबाबतच्या प्रश्नावर ज्या प्रकारे हसली त्यामुळं याच्या क्लीप अनेकांकडून शेअर केल्या जात आहेत. 

काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रा आणि मनू भाकर चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनू भाकर आणि नीरज चोप्रा त्यावेळी एकमेकांच्या नजरेला नजर देत नव्हते.त्यामुळं दोघांच्या बाबतीत चर्चा सुरु झाल्या.यानंतर पुढचा टप्पा म्हणजे नीरज चोप्रा आणि मनू भाकरची आई यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत मनू भाकरची आई सुमेधा भाकर नीरज चोप्रासोबत बोलताना डोक्यावर हाथ मारताना पाहयाल मिळाल्या. त्यामुळं मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियावर या चर्चांना बळ मिळालं, काही लोकांनी मनू भाकरची आई नीरज चोप्रासोबत लेकीच्या लग्नाची चर्चा करत असल्याचे दावे केले. मात्र, मनू भाकरच्या वडिलांनी समोर येत नीरज चोप्रा आणि मनू भाकर बाबतच्या सर्व चर्चा फेटाळल्या आणि चर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोपाच्या कार्यक्रमात भारताची ध्वजवाहक म्हणून मनू भाकरची निवड करण्यात आली होती.  मनू भाकर आणि भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश या दोघांनी भारताचे ध्वजवाहक म्हणून जबाबदारी पार पाडली. 

संबंधित बातम्या :

मनू भाकर अन् नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा; आता वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'अजून तिने विचार....'

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget