एक्स्प्लोर
न्यूझीलंडचा 5-0 ने विजय, पाकिस्तानला क्लीन स्विप
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधली पाचवी वन डे वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आली.

वेलिंग्टन : न्यूझीलंडने पाचव्या वन डेत पाकिस्तानवर 15 धावांनी निसटती मात केली. न्यूझीलंडने या विजयासह पाच वन डे सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधली पाचवी वन डे वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आली. या सामन्यात मार्टिन गप्टिलने झळकावलेल्या शतकाने न्यूझीलंडला 50 षटकांत 271 धावांची मजल मारुन दिली होती. गप्टिलने वन डे कारकीर्दीतलं तेरावं शतक साजरं केलं. त्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 100 धावांची खेळी उभारली. त्यानंतर मॅट हेन्री आणि मिचेल सॅन्टनरच्या प्रभावी माऱ्याने पाकिस्तानचा डाव 49 षटकांत 256 धावांत गुंडाळला. हेन्रीने 53 धावांत 4, तर सॅन्टनरने 40 धावांत 3 फलंदाजांना माघारी धाडलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























