एक्स्प्लोर
Advertisement
प्रतिस्पर्ध्यांना आपले कच्चे दुवे कधीच कळू देऊ नका: सचिन
मुंबई: तब्बल दोन दशक क्रिकेटच्या मैदानावर निर्विवादपणे वर्चस्व गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या क्रिकेट करिअरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 'आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपले कच्चे दुवे कधीच कळू देऊ नका' असा खास सल्ला सचिननं दिला.
सचिन म्हणाला की, 'एकदा एक जोरदार चेंडू माझ्या बरगड्यांवर आदळला. मी ते दुखणं कसंतरी सहन केलं. पण एक गोष्ट होती की, त्यावेळी माझ्या तोंडून एक हुंकार देखील बाहेर आला नाही. मी गोलंदाजाला त्याची जाणीवही होऊ दिली नाही. जर मी तसं केलं असतं तर तो अधिक आक्रमक झाला असता. तीन महिन्यानंतर मला स्कॅनिंगनंतर समजलं की, माझ्या एका बरगडीला दुखापत झाली आहे.'
तेंडुलकर पुढे म्हणाला की, 'मी प्रतिस्पर्ध्यांना कधीच जाणवू दिलं नाही की, मी थकलो आहे. कधीच हार मानली नाही. जर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना तुमचे कच्चे दुवे कळू दिली तर ते त्याचा नक्कीच फायदा उठवतील.'
200 कसोटी सामने आणि 463 वनडे सामने खेळणाऱ्या सचिननं आपल्या फिटनेस मंत्राबाबतही काही खास गोष्टी सांगितल्या. 'माझं एक रुटीन होतं आणि मी ते नेहमी पाळायचो. मी जेव्हापासून क्रिकेट खेळणं सुरु केलं तेव्हापासून मी मैदानावर सगळ्यात आधी पोहचायचो आणि सर्वात शेवटी निघायचो. मैदानावर मला कधीच थकवा जाणवला नाही.'
सध्याचे खेळाडू आपल्या फिटनेसबाबत फारच जागरुक आहेत. फक्त क्रिकेटच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक खेळामध्ये हे पाहायलं मिळतं आहे. मागील काही वर्षात आपल्या फिल्डिंगचा स्तर चांगलाच उंचावला आहे. 80 आणि 90च्या दशकात फिल्डिंगमध्ये आपण कमकुवत होतो पण आता याबाबत आपण सर्वश्रेष्ठ आहोत.' असंही सचिन म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement