'गोल्डन बॉय'ने इतिहास रचला, पंतप्रधान मोदींने केले कौतुक, भारतीय सैन्याचीही प्रतिक्रिया
World Athletics championships 2023: सुभेदार नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली.
World Athletics championships 2023: सुभेदार नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली. बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत 88.17 मीटर थ्रो करत नीरज चोप्रा याने सुवर्णपदकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या खेळाडूला सिलव्हर पदक मिळाले. नीरज चोप्रा याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्याक कौतुकाची थाप पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याच्या कामगिरीचे कौतुक केले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
नीरज चोप्रा हा उत्कृष्टतेचे उत्तम उदाहरण आहे. समर्पण, अचूकता आणि उत्कटता यामुळे नीरज फक्त अॅथलेटिक्समध्येच चॅम्पियन झाला नाही तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक बनलाय. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन., असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे कौतुक केलेय.
The talented @Neeraj_chopra1 exemplifies excellence. His dedication, precision and passion make him not just a champion in athletics but a symbol of unparalleled excellence in the entire sports world. Congrats to him for winning the Gold at the World Athletics Championships. pic.twitter.com/KsOsGmScER
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2023
भारतीय सैन्याकडून नीरज चोप्रा याचे अभिनंदन
नीरज चोप्रा याने बुडापेस्ट येथे सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर भारतीय सैन्याने त्याचे कौतुक केले. नीरज चोप्रा भरतीय लष्करात सध्या सुभेदार पदावर कार्यरत आहे. भारतीय लष्कराने नीरज चौप्रा याच्या कामगिरीचे कौतुक केलेय. नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्यावर आपल्याला गर्व आहे. बुडापेस्ट येथे अॅथलेटिक्स छॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत 88.17 मीटर थ्रो करत गोल्ड जिंकणाऱ्या सुभेदार नीरज चोप्रा याचे खूप खूप अभिनंदन, असे ट्वीट भारतीय सैन्याने केलेय.
#NeerajChopra makes us #Proud again!!#IndianArmy congratulates Subedar Neeraj Chopra on bagging #GoldMedal🥇 in Men's #Javelin at World Athletics Championship 2023 in Budapest with a throw of 88.17 meters.@Neeraj_chopra1 pic.twitter.com/mV76vQetWy
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 27, 2023
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातील नेत्यांनी नीरज चोप्रा याचे कौतुक केलेय. नीरज चोप्रा याच्या कामगिरीने देशभरातील लोक प्रभावित झाले आहेत. नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली, अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्राचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. 2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदकानंतर, जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणरी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदकं मिळाली आहेत. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरजनं रौप्यपदक जिंकलं होतं. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून नीरजनं देशासाठी जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेतलं पदकांचं वर्तूळ पूर्ण केलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्णकामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने 84.77 मीट भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने 84.14 मीटरपर्यंत भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.