एक्स्प्लोर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं यंदा ऑनलाईन वितरण, पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांची संपूर्ण यादी

आज राष्ट्रीय क्रीडा दिवस. या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन होणार आहे. खेलरत्न, अर्जुन पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांची संपूर्ण यादी इथे पाहा.

नवी दिल्ली : देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजर केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस साजर केला जातो. याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचंही वितरण केलं जातं. परंतु यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.

विविध विभागांमध्ये एकूण 74 जणांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यापैकी 64 जण सोहळ्याला उपस्थित राहतील. जे मानकरी वैयक्तिकरित्या सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाहीत, ते एकतर कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा विलगीकरणात आहेत. काही खेळाडू देशाबाहेर असल्याने ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.

आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंदही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असतील. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपापल्या शहराच्या स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरमधून हजर राहतील. याशिवाय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि काही प्रमुख पाहुणे विज्ञान भवनातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

पाच खेळाडू खेलरत्न तर 27 खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी यंदा पाच खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर 27 जणांचा अर्जुन पुरस्काराने गौरव केला जाईल. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान होणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्माचाही समावेश आहे. याशिवाय पैलवान विनेश फोगाट, टेबिल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅराऑलिम्पियन मरियाप्पन थांगावेलु यांची खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येईल.

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव विभाग) : धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (अॅथलेटिक्स), शिव सिंह (बॉक्सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्ण कुमार हुड्डा (कबड्डी), विजय भालचंद्र मुनिश्वर (पॅरा लिफ्टर), नरेश कुमार (टेनिस), ओमप्रकाश दहिया (कुस्ती)

द्रोणाचार्य पुरस्कार (सर्वसामान्य विभाग) : जूड फेलिक्स (हॉकी), योगेश मालवीय, (मल्लखांब), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप कुमार हंडू (वुशु), गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार : अतानु दास (तिरंदाजी), दुती चंद (अॅथलेटिक्स), सात्विकसाईराज रेंकीरेड्डी, चिराग शेट्टी, (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक, लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग) इशांत शर्मा, दिप्ती शर्मा (क्रिकेट), अजय अनंत सावंत (घोडेस्वारी), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिती अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंह, दीपिका (हॉकी), दीपक (कबड्डी) सरिका सुधाकर काळे (खो-खो), दत्तू बबन भोकानल (रोईंग), मनु भाकर, सौरभ चौधरी (नेमबाजी), मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस) दिविज शरण (टेनिस), शिवा केशवन (लूस), दिव्या काकरान, राहुल अवारे (कुस्ती), सुयश नारायण जाधव (पॅरा जलतरणपटू), संदीप (पॅरा अॅथलीट), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget