Mohammad Kaif On Rohit Sharma: 'रोहित शर्मानं 16 वर्ष दिलीत पण, आपण...', माजी क्रिकेटरकडून शुभमन गिलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित
Mohammad Kaif On Rohit Sharma: रोहितनं भारताना 16 वर्ष दिली, पण आम्ही त्याला एकही देऊ शकलो नाही, असं मोहम्मद कैफ म्हणाला आहे.

Mohammad Kaif On Rohit Sharma: बीसीसीआयनं (BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australian Mens Cricket Team) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीची (Virat Kohali) वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण पुढच्याच क्षणी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कर्णधार पदाची मान शुभमन गिलच्या (Shubman Gill) गळ्यात पडलीय. रोहित कर्णधार नाही, हे ऐकून चाहत्यांच्या हृदयाचे पार तुकडे तुकडे झाले. यावर सोशल मीडियावरही अनेकांनी खेद व्यक्त केला. अशातच आता माजी क्रिकेटपटून मोहम्मद कैफनं प्रतिक्रिया दिली आहे. रोहितनं भारताना 16 वर्ष दिली, पण आम्ही त्याला एकही देऊ शकलो नाही, असं मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) म्हणाला आहे.
माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोहम्मद कैफ म्हणाला की, "रोहित शर्मानं भारताला 16 वर्ष दिली, आणि आम्ही त्याला एकही देऊ शकलो नाही... कर्णधार म्हणून त्यानं 16 पैकी 15 आयसीसी स्पर्धा जिंकल्यात. त्यानं फक्त एकच सामना गमावला, तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तो मॅन ऑफ द मॅच होता. त्यानं तिथे ट्रॉफी जिंकली. भारतानं 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला."
रोहित शर्मानं कधीच असं काम केलेलं नाही...
मोहम्मद कैफ म्हणाला की, "2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर निवृत्त होऊन रोहित शर्मानं मोठेपणा दाखवला. चला नव्या खेळाडूंना संधी देऊयात... तो बाजूला गेला, काही काळ प्रसिद्धीपासून दूर राहिला, दुसऱ्यानं जबाबदारी घेतली, कर्णधारपद भूषवलं आणि जेव्हा नवे खेळाडू आले, तेव्हा त्यानं त्याचं स्थान गमावले. भारतात, जोपर्यंत तुमचा काळ आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर काढत राहता. पण रोहित शर्मानं तसं केलं नाही. त्यानं खेळाडू विकसित केलंय, त्यांचं संगोपन केलंय आणि त्यांना शिकवलं, तरीही तो त्यांना एक वर्षही देऊ शकला नाही..."
शुभमन गिलला कर्णधारपद
कैफ म्हणाला, "आम्ही 2027 च्या विश्वचषकापूर्वी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकलंय. आम्ही त्याला एक अतिरिक्त वर्ष देऊ शकलो नाही, तो कर्णधार ज्यानं आठ महिन्यांत आम्हाला दोन ट्रॉफी जिंकून दिल्या. त्याचं नाव घेतलं जाणार नाही, शुभमन गिल जबाबदारी स्वीकारेल. शुभमन गिल तरुण आणि नवीन आहे, तो एक चांगला कर्णधार होऊ शकतो, पण प्रत्येक गोष्टीत घाई का करायचीय? त्याला उच्च किमतीत नेतृत्व का द्यायचे? त्याची वेळ येईल, पण आत्ताच रोहित शर्माची वेळ आली आहे..."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा स्क्वाड
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, कृष्णा प्रभू, अरश, कृष्णा, कृष्णा, अरविंद (विकेटकीपर), यशस्वी जायस्वाल.























