Meghalaya : टेबल टेनिसपटू डी विश्वाचा भीषण अपघातात मृत्यू, शिलॉंगला जाताना अपघात
Table Tennis Player D Vishwa : तामिळनाडूतील अव्वल टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तो 83व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिलाँगला जात होता.
Table Tennis Player D Vishwa : तामिळनाडूच्या अव्वल टेबल टेनिसपटूंपैकी एक दीनदयालन विश्वाचा (Deenadayalan Vishwa) भीषण अपघातात मृत्यू झाला. गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला जात असताना ही दुर्घटना घडली. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 83व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी गुवाहाटीहून शिलाँगला जात असताना रविवारी त्याचा अपघात झाला. गंभीर जखमी झाल्यानं दीनदयालन विश्वचा मृत्यू झाला.
तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू दीनदयालन हा विश्वा तमिजगा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष संघाचा खेळाडू होता. मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणाऱ्या 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो जात होता. या अपघातात कार चालकाचाही गंभीर जखमी झाला असून त्याचं नाव दीपल दास असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला जात असताना हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग सहावर मागून येणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं कारला उडवलं आणि 50 मीटर दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालक आणि कारमधील जखमींना तात्काळ नॉनपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. गंभीर जखमींना नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस (NEIGRIHMS) रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे. डी विश्वाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नोंगपोह सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Lakhimpur Accident : भाजप आमदाराच्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उडवलं, दोघांचा मृत्यू
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत 2183 नवे रुग्ण, 214 जणांचा मृत्यू
- PM Modi : आजपासून पंतप्रधान मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर, 22 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha