Coronavirus Cases Today : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत 2183 नवे रुग्ण, 214 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 2183 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1150 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 4 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 965 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 542 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 542 इतकी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 542 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 1985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 965 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 10 हजार 773 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 2 लाख 66 हजार 459 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 54 लाख 94 हजार 355 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
India reports 2,183 fresh #COVID19 cases, 1,985 recoveries and 214 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) April 18, 2022
Active cases 11,542 pic.twitter.com/UfFx8H3ao4
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi : आजपासून पंतप्रधान मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर, 22 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Lakhimpur Accident : भाजप आमदाराच्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उडवलं, दोघांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha