एक्स्प्लोर

टी-20 तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल

टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेला कोलंबोत सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाली आहे.

कोलंबो/मुंबई : रोहित शर्माच्या टीम इंडियासह श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेला कोलंबोत मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाली आहे. आयपीएलच्या अकराव्या युद्धाचे नगारे वाजू लागले आहेत. आयपीएलच्या या युद्धाला तोंड फुटण्याआधी भारतीय क्रिकेटरसिकांना संधी मिळणार आहे ती टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेचा आनंद लुटण्याची. रोहित शर्माच्या टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. या तिरंगी मालिकेतल्या सर्व सामन्यांचं आयोजन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरच करण्यात आलंय. त्यातल्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ ही श्रीलंकेशी पडणार आहे. अनुभवी खेळाडूंना विश्रांती, रोहित शर्माकडे सूत्रं टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वन डे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेत घवघवीत यश मिळवलं. त्या दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहेत. रोहित शर्माने आजवर कर्णधार या नात्याने चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत जबाबदारी सांभाळली आहे. त्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय साजरा केला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्यानेही रोहितच्या गाठीशी आयपीएलच्या रणांगणातला सर्वोच्च अनुभव आणि यश आहे. त्यामुळे कर्णधार या नात्याने टीम इंडियाला श्रीलंकेत विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार नाही, अशी आशा आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची एक कर्णधार या नात्याने अनुपस्थिती जाणवू न देण्याची मोठी जबाबदारी रोहितसह शिखर धवन, सुरेश रैना आणि मनीष पांडेवर राहिल. यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतचाही भारतीय फलंदाजीला मोठा आधार लाभेल. रिषभ पंतने यंदा मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अवघ्या 32 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. श्रीलंकेतल्या मालिकेतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच तडफदार खेळींची अपेक्षा राहील. युवा खेळाडूंवर गोलंदाजीची धुरा दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणाऱ्या प्रमुख गोलंदाजांऐवजी भारतीय संघात शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. शार्दूलने दक्षिण आफ्रिकेतल्या अखेरच्या टी-20 सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. पण डावखुऱ्या जयदेव उनाडकटवर आयपीएलच्या लिलावात आलेली साडेअकरा कोटींची बोली सार्थ ठरवण्याची अजूनही जबाबदारी आहे. चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताच्या फिरकी आक्रमणाची भिस्त राहिल. आयसीसीच्या टी-20 सामन्यांच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत श्रीलंका आठव्या तर बांगलादेश दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेच्या रणांगणात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. त्यात टीम इंडियाने गेल्या वर्षभरात टी-20 सामन्यांच्या पाच मालिकांवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेली रोहित शर्माची टीम इंडिया श्रीलंकेतही तीच विजयी परंपरा कायम राखेल, असा जाणकारांना विश्वास आहे. भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (विकेटकीपर)

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Embed widget