एक्स्प्लोर

Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

Team India Squad For ODI World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या यजमानपदाखाली 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप होणार आहे.

Team India Squad For ODI World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या यजमानपदाखाली 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेला अजून बराच वेळ असला तरी भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात युवा खेळाडूंना संधी देण्यासोबतच अनुभवी खेळाडूंच्या भवितव्याबाबतही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी 2027 वनडे वर्ल्डकपसाठी आपला संभाव्य भारतीय संघ निवडला आहे. गावसकरांनी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या संघातील काही निवडी विशेष चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

रोहित शर्मा-शुभमन गिल सलामीला

सुनील गावसकरांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. रोहितच्या 2027 वर्ल्डकपमधील सहभागाबाबत सध्या मोठी अनिश्चितता आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन रोहितला 2027 वर्ल्डकपच्या योजनांमध्ये पाहत नसल्याचा दावा करणारे वृत्त समोर आले होते. मात्र, लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या वनडेत रोहितने शानदार शतक झळकावत टीकाकारांना जोरदार उत्तर दिले. त्यानंतर त्याच्या भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. बीसीसीआयने रोहित लॉर्ड्सनंतरही खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी तो 2027 वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. गावसकरांनी मात्र रोहितला आपल्या वर्ल्डकप संघात स्थान देत त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.

यशस्वी जैस्वालला मात्र संधी नाही, विराट कोहलीवर विश्वास

गेल्या काही वनडे सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वालने दमदार कामगिरी करत वर्ल्डकपच्या संघासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. त्याने मागील तीन वनडे डावांपैकी दोन डावांत शतके झळकावली आहेत. असे असतानाही गावसकरांच्या 15 सदस्यीय संघात जैस्वालला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे ही निवड अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. गावसकरांनी अनुभवी विराट कोहलीलाही संघात कायम ठेवले आहे. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनाही संघात स्थान मिळाले आहे. मधल्या फळीतील फलंदाजीसोबतच संघाची विकेटकीपिंगची जबाबदारीही केएल राहुल किंवा ईशान किशन यांच्याकडे सोपवता येऊ शकते. गावसकरांच्या संघात ईशान किशनलाही स्थान देण्यात आले आहे.

हार्दिकसह 4 ऑलराउंडर्स

गावसकरांच्या संघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तब्बल चार ऑलराउंडर्स निवडले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या संघातील महत्त्वाचा वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराउंडर असेल, तर अक्षर आणि जडेजा डावखुरे फिरकी पर्याय देतात. नितीश कुमार रेड्डीला भविष्यातील पर्याय म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत अतिरिक्त पर्याय उपलब्ध राहतील. फिरकी विभागात गावसकरांनी कुलदीप यादवला स्थान दिले आहे. त्याच्यासोबत अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा हे दोन फिरकीपटू-ऑलराउंडर्स असल्याने भारताकडे तीन प्रभावी फिरकी पर्याय असतील.

बुमराहच्या साथीला तीन वेगवान गोलंदाज

गावसकरांनी वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. बुमराह हा संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असेल. मात्र, सध्या त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. श्रीलंका दौऱ्यापूर्वी बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष लागले आहे. त्याच्यासोबत सिराजचा अनुभव, हर्षित राणाचा वेग आणि अर्शदीप सिंहचा डावखुरा वेगवान गोलंदाजीचा पर्याय भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

शमी आणि भुवनेश्वरला जागा नाही

गावसकरांच्या संघात मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांना स्थान मिळालेले नाही. शमीला भारतीय संघात परत आणण्याची मागणी चाहत्यांकडून होत असली, तरी निवडकर्त्यांच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचे स्थान किती असेल, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. भुवनेश्वर कुमारबाबतही अशीच परिस्थिती आहे.

सुनील गावसकर यांनी 2027 च्या विश्वचषकासाठी हा संघ निवडला - शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव, इशान किशन, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी.

हे ही वाचा -

IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Ind vs Afg 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
Embed widget