Asian Championship Final | मेरी कोमची एआयबीएच्या 'चॅम्पियन्स अँड व्हेटरन्स' समितीच्या अध्यक्षपदी निवड
इतर पॅनेल सदस्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. मेरी कॉम सध्या बोक्सॉम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पेनमध्ये असून ट्विटद्वारे या सन्मानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : सहा वेळा विश्वविजेत्या असलेल्या एम.सी. मेरी कोमची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) 'चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स' समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संस्थेने गेल्या वर्षी हे पॅनेल बनवले होते. एआयबीएच्या संचालक मंडळावर मतदानानंतर 37 वर्षांच्या ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणाऱ्या मेरी कोमची या पदावर निवड करण्यात आली आहे. ही स्टार बॉक्सर बर्याच वेळा जागतिक संघटनेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून राहिली आहे.
एआयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी मेरी कोम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “एआयबीएच्या संचालक मंडळाचे मेलद्वारे मतदान घेल्यानंतर तुम्हाला एआयबीएच्या चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स कमिटीची अध्यक्ष म्हणून निवडले आहे.
ते म्हणाले, की "मला खात्री आहे की तुमचे अफाट ज्ञान व अनुभवाने तुम्ही या महत्त्वपूर्ण समितीच्या कार्याला हातभार लावाल." या समितीची स्थापना मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली आहे. यात जगभरातील अनुभवी आणि विजेत्या बॉक्सरचा समावेश आहे. जे आपले अनुभव सांगण्यास तयार आहेत.' दरम्यान, इतर पॅनेल सदस्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. मेरी कॉम सध्या बोक्सॉम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पेनमध्ये असून ट्विटद्वारे या सन्मानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.