Mahendra Singh Dhoni : सिनेमाच्या मैदानात एमएस धोनीची एन्ट्री, पहिल्याच चित्रपटाची केली घोषणा, जाणून घ्या सर्वकाही...
Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
Mahendra Singh Dhoni First Film : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. निर्माता म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड'च्या बॅनरखाली त्याने आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे.
'लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट'ने सोशल मीडियावर या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मोशन पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"धोनी एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत पहिली कलाकृती सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत".
'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड'मध्ये कोणते कलाकार झळकणार?
हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार 'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तसेच या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत.
View this post on Instagram
'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात इवाना मुख्य भूमिकेत आहे. 'लव्ह टुडे' या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचे मोशन पोस्टर अॅनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे.
'धोनी एन्टरटेनमेंट'बद्दल जाणून घ्या... (Dhoni Entertainment)
महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात 25 जानेवारी 2019 रोजी केली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत तीन शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यात 'रोर ऑफ द लॉइन', 'बिलेज टु ग्लोरी' आणि 'द हिडन हिंदू' सारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. आता सिनेसृष्टीत झळकण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
संबंधित बातम्या